Join us

काय आहे ईटिंग डिसऑर्डर, ज्यामुळे वाढते शुगर आणि कोलेस्टेरॉल? कुणाला अधिक धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:59 IST

Eating Disorder : जर दर अर्ध्या तासानं किंवा एका तासानंतर बिस्कीट, चिवडा, चिप्स, कप केकसारख्या गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल हा ईटिंग डिसऑर्डरचा संकेत असू शकतो.

Eating Disorder : सामान्यपणे भरपूर लोक दिवसभरातील तीन मुख्य जेवणाशिवाय काहीना काही बारीक-सारीक खातच असतात. पण जर दर अर्ध्या तासानं किंवा एका तासानंतर बिस्कीट, चिवडा, चिप्स, कप केकसारख्या गोष्टी खाण्याची इच्छा होत असेल हा ईटिंग डिसऑर्डरचा संकेत असू शकतो. हा डिसऑर्डर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला प्रभावित करू शकतो.

ईटिंग डिसऑर्डरबाबत तुम्हाला फार काही माहीत नसेल, पण Michigan Medicine च्या एका रिपोर्टमध्ये नॅशनल ईटिंग डिसऑर्डर असोसिएशनच्या हवाल्यानं सांगण्यात आलं की, जगभरात जवळपास ७० मिलियन लोक ईटिंग डिसऑर्डरनं पीडित आहेत आणि अमेरिकेत साधारण ३० मिलियन लोक खाण्यासंबंधी या आजाराशी झगडत आहेत.

ईटिंग डिसऑर्डर कोणत्याही वयाच्या, साईजच्या आणि कोणत्याही भागातील लोकांना प्रभावित करू शकतो. पण जास्तीत जास्त लोकांना या आजाराबाबत काहीच माहीत नाही. अशात हा आजार काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे ईटिंग डिसऑर्डर?

ईटिंग डिसऑर्डर एक प्रकारची सायकॉलॉजिकल कंडिशन आहे. ज्यात लोक लोकांचा खाण्याची पद्धत असामान्य असते. जी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रभाव टाकते. या डिसऑर्डरमध्ये एखादी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त खाते तर कुणी खूप कमी खातात. ज्यामुळे त्यांचं वजन फार जास्त वाढतं किंवा फार जास्त कमी होतं. सोबतच लोक आपल्या बॉडीबाबत निगेटिव्ह विचार करू लागतात. ही समस्या महिलांमध्ये अधिक बघितली जाते.

ईटिंग डिसऑर्डरचे प्रकार

एनोरेक्सिया नर्वोसा

बुलीमिया नर्वोसा

बिंज ईटिंग डिसऑर्डर

पिका

रुमिनेशन डिसऑर्डर

अवॉयडेंट फूड इंटेक डिसऑर्डर

कॉमन ईटिंग डिसऑर्डरमध्ये एनोरेक्सिया नर्वोसा, बुलिमिया नर्वोसा आणि बिंज ईटिंग डिसऑर्डर यांचा समावेश आहे.

एनोरेक्सिया नर्वोसामध्ये फूड किंवा कॅलरीवर रिस्ट्रिक्शन, वजन वाढण्याची भीती आणि डिस्टॉर्टेड सेल्फ इमेजचा समावेश आहे.

बुलिमिया नर्वोसामध्ये कमी वेळात जास्त खाणं किंवा हे समजून चालणं की, जेवण जास्त केलं, त्यानंतर उलटी करून पोट रिकामं करणं किंवा जास्त व्यायाम करणं यासारखी लक्षणं दिसतात.

तसेच बिंज ईटिंग डिसऑर्डरमध्ये काही खाणं आणि विचार करणं की, कमी वेळात फार जास्त खाल्लं आहे. त्यानंतर लाज वाटणे, पश्चाताप, गिल्ट आणि डिप्रेशन होऊ लागतं.

ईटिंग डिसऑर्डरची लक्षणं

मूड स्विंग्स

थकवा

बेशुद्ध पडणे किंवा चक्कर येणे

केस पातळ होणे किंवा केसगळती

अचानक वजन कमी होणं

जास्त घाम येणं

कॉन्स्टिपेशन

जास्त भूक लागणं

जेवण न जाणं

ईटिंग डिसऑर्डरची कारणं

Cleveland clinic नुसार, ईटिंग डिसऑर्डरचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण काही रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, अशी अनेक कारणं आहे जी खाण्यासंबंधी अनेक आजारांना जन्म देतात. त्यात जेनेटिक, ब्रेन बायोलॉजी, मेंटल हेल्थ कंडीशन्स कल्चरल किंवा सोशल आयडल इत्यादीचा समावेश आहे.

ईटिंग डिसऑर्डरचे धोके

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, या आजारावर उपचार केले नाही तर यामुळे आरोग्यासंबंधी काही गंभीर समस्या होऊ शकतात. त्यात हार्ट फेलियर किंवा हार्ट प्रॉब्लम्स, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, लो बीपी, ऑर्गन फेलियर आणि ब्रेन डॅमेज, गंभीर डिहायड्रेशन आणि कॉस्टिपेशन, पीरियड्स न येणं किंवा इनफर्टिलिटी आणि स्ट्रोक यांचा समावेश आहे.

ईटिंग डिसऑर्डरवर उपचार

ईटिंग डिसऑर्डरसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी दिल्या जातात. ज्यात आर्ट थेरपी, रिक्रिएशन थेरपी आणि म्युजिक थेरपी प्रमुख आहेत. त्याशिवाय बिहेवियरल थेरपी, कॉग्निटिव रेमेडिएशन थेरपी, फॅमिली थेरपी आणि इंटरपर्सनल सायकोथेरपी यांचीही मदत घेतली जाते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स