Join us

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही मेंदू कुजतोय! कसा ओळखाल तुमचा ब्रेन रॉट नावाचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 15:06 IST

What Is Brain Rot Disease: सोशल मिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे हा आजार होत असून आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा आजार असू शकतो..

ठळक मुद्दे या लोकांमध्ये विसराळूपणाही वाढत जातो. तसेच एकाग्रताही हळूहळू कमी होत जाते. हल्ली अशी लक्षणं बऱ्याच लोकांमध्ये जाणवत आहेत.

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही (screen addiction in children). कारण त्यांच्या घरातली प्रौढ मंडळीही तेच करत आहेत. बऱ्याचदा तर लहान मुलांच्या बाबतीत असंही होताना दिसतं की जोपर्यंत घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात त्यांना मोबाईल दिसत नाही किंवा घरातलं कोणीही टीव्ही लावत नाही, तोपर्यंत त्यांना मोबाईल किंवा टीव्हीची आठवण येत नाही. पण घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात मोबाईल दिसला की मग लगेच ते मोबाईलसाठी हट्ट करायला सुरुवात करतात (mobile or screen addicted persons). यातला महत्त्वाचा मुद्दा हाच की हल्ली लहानांपासून अगदी वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलने वेड लावलं असून त्याचाच अतिवापर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहे. त्या आजारांपैकीच एक आहे ब्रेन रॉट.(what is brain rot?)

 

ब्रेन रॉट म्हणजे नेमका कोणता आजार?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते की थोडा मोकळा वेळ मिळाला की लगेच ते हातात मोबाईल घेऊन बसतात आणि रिल्स बघायला सुरुवात करतात. यापैकी बऱ्याच रिल्स अशाही असतात ज्यात त्यांना अजिबात रस नसतो. किंवा ते त्यांच्या आवडीचे विषयही नसतात.

'हा' पदार्थ आहे खूपच दुर्लक्षित; पण निरोगी दिर्घायुष्यासाठी ठरतो उपयुक्त! बघा नेमकं काय

पण तरीही समोर काहीतरी आलंय ना मग बघत बसायचं आणि एकानंतर एक स्क्रोलिंग करत जायचं. जोपर्यंत मोबाईलवर काही ना काही सुरू हाेत नाही तोपर्यंत या व्यक्तींचं कशातच लक्ष लागत नाही. हा एक प्रकारचा आजार असून त्यालाच ब्रेन रॉट म्हणतात असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांनी नुकताच एक अभ्यास करून सांगितलं आहे.

 

ज्यांना ब्रेन रॉटचा त्रास असतो त्या व्यक्तींना कोणते ना कोणते रिल्स, व्हिडिओ किंवा मोबाईल पाहिल्याशिवाय अजिबात करमत नाही.

फुलाफुलांचा काळा फ्रॉक घालून डकोटा जॉन्सन फिरली मुंबई, तिच्या ड्रेसची किंमत हाेती....

त्यांची बौद्धिक क्षमता, विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते कारण मेंदू मोबाईल जे काही दाखवेल ते पाहण्यातच पुर्णवेळ गुंतलेला असतो. या लोकांमध्ये विसराळूपणाही वाढत जातो. तसेच एकाग्रताही हळूहळू कमी होत जाते. हल्ली अशी लक्षणं बऱ्याच लोकांमध्ये जाणवत आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि मोबाईलचा, रिल्स पाहात बसण्याचा अतिरेक टाळा.. 

 

टॅग्स : आरोग्यमानसिक आरोग्यमोबाइलसोशल मीडिया