Join us

सावधान! Bleeding Eye व्हायरस म्हणजे काय? ८ दिवसांत होतो रुग्णाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:01 IST

Bleeding Eye Virus : ब्लीडिंग आय व्हायरसचं सायंटिफीक नाव हेमोरेजिक काँजंक्टिव्हायटीस आहे. हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे.

कोरोना व्हायरसनंतर आता एक नवा व्हायरस जगभर कहर करण्याच्या तयारीत आहे. आफ्रिकेतील रवांडा येथे मारबर्ग म्हणजे ब्लीडिंग आय दिसून येत आहे, जो अत्यंत धोकादायक आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसत आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मारबर्ग व्हायरसला ब्लीडिंग आय असंही म्हणतात. हा व्हायरस इबोला व्हायरस कुटुंबातील आहे आणि रवांडामध्ये वेगाने पसरत आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, याचा मृत्यूदर ८८ टक्के आहे. लक्षणं गंभीर असल्यास आठ ते नऊ दिवसांत रुग्णांचा मृत्यू होतो. परंतू जर याबाबत आधीच माहिती मिळाली तर लवकर उपचार केले जाऊ शकतात.

ब्लीडिंग आय व्हायरसचं सायंटिफीक नाव हेमोरेजिक काँजंक्टिव्हायटीस आहे. हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यामुळे डोळ्यांतून रक्तस्त्राव होण्याची लक्षणं दिसू शकतात. या समस्येदरम्यान डोळ्यांच्या पांढऱ्या भागात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. हा व्हायरस वेगाने पसरतो.

कसा होतो प्रसार?

डॉक्टरांच्या मते, हा व्हायरस झुनोटिक आहे, म्हणजेच तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. हे विशेषतः वटवाघळांपासून आलेला आहे आणि वटवाघळांची लाळ, रक्त याच्या संपर्काद्वारे माणसांमध्ये पसरतो.

WHO च्या मते, २ ते २१ दिवसांत याची लक्षणं दिसू लागतात.

लक्षणं

- डोळ्यांची जळजळ आणि खाज येणे - डोळ्याच्या पांढऱ्या भागात लालसरपणा किंवा रक्ताची गुठळी - सौम्य ताप - स्नायू दुखणे - अतिसार - तीव्र डोकेदुखी - पोटदुखी - नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव - अंधुक दिसणे.

अशी घ्या आरोग्याची काळजी

चिंतेची बाब म्हणजे सध्या यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. आफ्रिकन देशांमध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्यामुळे तेथे प्रवास करणे टाळा. संक्रमित व्यक्तीशी संपर्क टाळा. तुम्हाला फ्लूची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी बोला. स्वच्छतेची काळजी घ्या. वेळोवेळी हात धुवा  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यडोळ्यांची निगा