Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दात कायम पिवळे दिसतात? झोपण्याआधी चिमूटभर हा पदार्थ दातांवर घासा; सकाळी चमकतील दात

दात कायम पिवळे दिसतात? झोपण्याआधी चिमूटभर हा पदार्थ दातांवर घासा; सकाळी चमकतील दात

What Is best Solution For Whiten Your Teeth, Teeth Whitening Tips : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:40 IST2025-09-03T15:06:20+5:302025-09-03T15:40:07+5:30

What Is best Solution For Whiten Your Teeth, Teeth Whitening Tips : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.

What Is best Solution For Whiten Your Teeth Ayurvedic doctor Shares Home Remedies | दात कायम पिवळे दिसतात? झोपण्याआधी चिमूटभर हा पदार्थ दातांवर घासा; सकाळी चमकतील दात

दात कायम पिवळे दिसतात? झोपण्याआधी चिमूटभर हा पदार्थ दातांवर घासा; सकाळी चमकतील दात

दातांचा पिवळेपणा, टार्टर, प्लाक या खूपच कॉमन समस्या आहेत. अशी अनेकांची तक्रार असते की रोज ब्रश केल्यानंतरही दात पिवळे दिसातत. (Teeth Whitening Tips) याशिवाय हिरड्यांनाही दुर्गंध येतो. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉक्टर सलिम जैदी यांनी एक घरगुती उपाय सांगितला आहे. ज्यामुळे दात नैसर्गिकरित्या पांढरे होतील आणि दुर्गंधही येणार नाही. (Best Solution For Whiten Your Teeth)

दात पिवळे का पडतात?  (How To Clean Yellowness Of Teeth)

डॉक्टर जैदी सांगतात की प्लाकमुळे पिवळे दात दिसतात. प्लाक एक चिकट पदार्थ आहे जो बॅक्टेरियाजमुळे तयार होतो. हे बॅक्टेरिया एसिड बनवतात. जे हळू हळू दातांच्या वरच्या एनॅमला नुकसान पोहोचवते. वेळेवर  साफ न केल्यामुळे हा थर टार्टरमध्ये बदलतो. जे सामान्य ब्रशिंगमुळे जात नाही. याच कारणामुळे दात कमकुवत होतात (Ref). म्हणूनच डॉक्टर बेकिंग सोड्याचा वापर करण्याचा सल्ला देतात. बेकिंग सोडा अल्कलाईन असतो ज्यामुळे बॅक्टेरियाजद्वारे तयार होणारं एसिड न्युट्रिलाईज करता येतं. याचे टेक्चर प्लाकला हळूहळू हटवते. याती एंटी बॅक्टेरिअल प्रोपर्टीज बॅक्टेरियाज वाढण्यापासून रोखतात. याच कारणामुळे कॅव्हिटीपासून बचाव होतो.

रात्री १ चिमूट बेकिंग सोडा घ्या. पाणी घालून त्याची जाड पेस्ट बनवा. ही पेस्ट दातांवर लावून २ मिनिटं रगडत राहा तुम्ही ब्रशने किंवा बोटाच्या साहाय्यानं दातांवर बेकींग सोड्याचं मिश्रण फिरवू शकता. खासकरून हिरड्यांची लाईन आणि दातांच्या मागच्या भागावर हळूवार ब्रश फिरवा.  आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. याव्यतिरिक्त १ चमचा बेकिंग सोडा घालून माऊथवॉश बनवू शकता. 

या गोष्टींची काळजी घ्या (Oral Health Tips)

आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात बेकिंग सोडा टुथपेस्टचा ऑपश्न नाही. याच्या रोजच्या वापरानं दातांचे नुकसान होऊ शकते. आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा बेकिंग सोडा लावून दातांची सफाई करा. रोज सकाळी-संध्याकाळी फ्लोराईडयुक्त टुथपेस्टनं ब्रश करा. फ्लोराईट  इनॅमल मजबूत करते. याशिवाय फ्लोसिंग करा. दर सहा महिन्यांनी तपासणी करत राहा. नियमित दिवसातून दोनवेळा ब्रश करा.

Web Title: What Is best Solution For Whiten Your Teeth Ayurvedic doctor Shares Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.