भारतीय लोक गोड खाण्याचे शौकीन असतात. चहा, कॉफीसोबत वेगवेगळ्या पॅकेज्ड फुडचं तुम्ही दिवसभरात सेवन करत असाल. पण जास्त प्रमाणात गोड खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. (Weight Loss Tips) जास्त गोड खाल्ल्यानं लठ्ठपणा, डायबिटीस, फॅटी लिव्हर आणि अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात.
गोड खाणं टाळल्यानं तब्येतीचं नुकसानही होऊ शकतं. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की २० दिवस गोड न खाल्ल्यानं शरीरात कसे बदल होतात. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही आपल्या आरोग्यात सुधारणा करु शकता. (What Happens When You Stop Eating Sugar For 20 days)
एक्सपर्ट्स काय सांगतात?
प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पोषणतज्ज्ञ सांगतात की तुम्ही फक्त २० दिवस साखर सोडली तर शरीरात बरेच सकारात्मक बदल दिसून येतील. त्या सांगतात की साखर सोडल्यानं लिव्हरला बरेच फायदे मिळतात. लिव्हरभोवती जमा झालेलं फॅट कमी होतं इंसुलिन सेंसिटिव्हीटी चांगली होते. याशिवाय गोड खाणं कमी केल्यानं लिव्हर व्यवस्थित कार्य करते.
मेटाबॉलिझ्म एक्टिव्ह होण्यास मदत होते
जेव्हा तुम्ही साखर खाणं सोडता तेव्हा शरीर शुगरवर डिपेंड न राहता फॅट बर्न करणं सुरू करते. यामुळे फास्टिंग इंसुलिन लेव्हल कमी होते आणि मेटाबॉलिझ्म वेगानं होतं. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. लवनीत बत्रा सांगतात की २० दिवस साखर न खाल्ल्यानं आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
आतड्यातील गुड बॅक्टेरियाज वाढतात आणि इफ्लेमेशनची निगडीत हानीकारक बॅक्टेरिया कमी होतात. साखर खाल्ल्यानं SCFAs (गट-हीलिंग कंपाउंड्स) वाढतात जे पचन मजबूत ठेवतात. साखर सोडल्यानं बीडीएनएफ नावाचे ब्रेन ग्रोथ फॅक्टर वाढते. ज्यामुळे मेंदूच्या क्लॅरिटी, मेमरी आणि मूड चांगला राहतो. याशिवाय हळूहळू शुगर क्रेव्हींग्स कमी होत जातात.
त्वचेवर ग्लो दिसतो
जास्त साखर खाल्ल्यानं एजिंग प्रोसेस वेगानं होतं. जेव्हा तुम्ही साखर खाणं सोडाल तेव्हा स्किन हायड्रेट राहते पिंपल्स कमी होतात आणि स्किन एजिंग कमी होते.
झोप कमी होते आणि एनर्जी लेव्हल वाढते
साखर न खाल्ल्यानं शुगर लेव्हल स्टेबल राहते आणि एनर्जी टिकून राहते. झोप चांगली राहते आणि रिलॅक्सिंग राहते. कारण कॉर्टिसोल आणि मेलाटोनिन बॅलेन्स योग्य प्रमाणात राहतो.