Ginger Oil M Benefits : आपल्या माहीत आहेच की, आल्याचा वापर पदार्थांची, चहाची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. आल्याने चव तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आल्याचं तेलही खूप फायदेशीर असतं. आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण आल्याचं आल्याचं तेल डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतं. आजकाल कॉम्प्युटर, मोबाईलवर लोक भरपूर वेळ घालवतात. तासंतास स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांवर तणाव वाढतो, थकवा येतो आणि कमजोरीही जाणवते. आपल्याला सुद्धा डोळ्यांसंबंधी या समस्या होत असतील तर आल्याचं तेल आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. याने डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि दृष्टी सुधारण्यासही मदत मिळेल.
कसा घालवाल डोळ्यांचा थकवा?
डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी आल्याचं तेल बेस्ट मानलं जातं. भारत सरकारचं आयुष मंत्रालय सांगतं की, आल्याच्या तेलाने नियमितपणे तळपायांची मालिश केल्यास डोळे चांगले राहतात आणि अनेक समस्या दूर होतात. आयुर्वेदानुसार, पायांमध्ये अशा अनेक नसा असतात, ज्या थेट डोळ्यांशी कनेक्टेड असतात. पायातील चार मुख्य नसा डोळ्यांशी कनेक्टेड असतात. यावर तेलाने मालिश केली तर डोळ्यांचा तणाव दूर होईल, दृष्टी चांगली राहील आणि डोळ्यांची ड्रायनेस अशा समस्यांपासून बचाव होईल.
मुळात आल्याचं तेल हे उष्ण असतं. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि वात दोष संतुलित राहतो. याने डोळ्यांपर्यंत पोषण पोहोचतं आणि थकवा कमी होतो. रात्री झोपण्याआधी आल्याच्या तेलाने पायांची मालिश केल्यास डोळे तर निरोगी राहतातच, सोबतच चांगली झोप लागेल, तणाव कमी होईल आणि पायांवरील सूज आणि वेदनाही कमी होतील. आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. जे सूज कमी करून ब्लड फ्लो वाढवतात.
आल्याच्या तेलाने डोळ्यांचा थकवा आणि डोळ्यांच्या आजूबाजूचा तणाव कमी करण्यास मदत मिळते. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय करणं अगदी सोपा आहे. आल्याचं शुद्ध तेल घ्या किंवा तिळाच्या तेलात थोडं आल्याचं तेल मिक्स करून हलकं गरम करा. या तेलाने तळपाय, बोटांची साधारण १० ते १५ मिनिटं मालिश करा. मालिश केल्यावर पाय गरम पाण्याने धुवा किंवा सॉक्स घालून झोपा.
आयुर्वेद एक्सपर्ट सल्ला देतात की, डोळे कमजोर होऊ द्यायचे नसतील तर रोज पादाभ्यंग म्हणजेच पायांची मालिश करा. याने केवळ डोळ्यांनाच नाही तर पूर्ण शरीराला अनेक फायदे मिळतात. पायांची नियमित मालिश केल्यास काही आठवड्यातच आपल्याला फरक दिसून येईल.
