Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भाजी-वरणातला कढीपत्ता रोज खाण्याचे ४ फायदे, हंसाजी योगेंद्र यांचा सल्ला १४ दिवस रोज खाऊन पाहा

भाजी-वरणातला कढीपत्ता रोज खाण्याचे ४ फायदे, हंसाजी योगेंद्र यांचा सल्ला १४ दिवस रोज खाऊन पाहा

What Happens When You Eat Curry Leaves For 14 Days : यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:40 IST2026-01-25T15:12:36+5:302026-01-27T14:40:35+5:30

What Happens When You Eat Curry Leaves For 14 Days : यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.

What Happens When You Eat Curry Leaves For 14 Days Curry Leaves Benefits | भाजी-वरणातला कढीपत्ता रोज खाण्याचे ४ फायदे, हंसाजी योगेंद्र यांचा सल्ला १४ दिवस रोज खाऊन पाहा

भाजी-वरणातला कढीपत्ता रोज खाण्याचे ४ फायदे, हंसाजी योगेंद्र यांचा सल्ला १४ दिवस रोज खाऊन पाहा

प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात कढीपत्ता वापरला जातो. सुप्रसिद्ध योगगुरू डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, जर तुम्ही सलग १४ दिवस नियमाने कढीपत्त्याचे सेवन केले, तर तुमच्या शरीरात आणि केसांच्या आरोग्यात अत्यंत सकारात्मक बदल घडून येतात. कढीपत्त्यामध्ये लोह (Iron), कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन A, B, C, E मुबलक प्रमाणात असतात. यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. (What Happens When You Eat Curry Leaves For 14 Days)

सलग १४ दिवस कढीपत्ता खाल्ल्यानं काय फायदे होतील?

१. केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय: कढीपत्त्यात 'बीटा-कॅरोटीन' आणि प्रथिने असतात. अनेकदा पोषक तत्वांच्या अभावामुळे केस गळतात. सलग दोन आठवडे कढीपत्ता खाल्ल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते, केस गळणे थांबते आणि केस नैसर्गिकरित्या काळे व दाट होण्यास मदत होते.

२. पचनसंस्थेत सुधारणा: जर तुम्हाला गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर कढीपत्ता तुमच्यासाठी उत्तम औषध आहे. हे पाचक एन्झाइम्स उत्तेजित करते, ज्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचते आणि पोटाचे विकार दूर होतात.

३. त्वचेचे आरोग्य आणि चमक: रक्तातील विषारी घटक बाहेर टाकल्यामुळे त्वचेवरील मुरुमे कमी होतात. कढीपत्त्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

४. मधुमेह आणि वजन नियंत्रण: कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तसेच, हे शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून अतिरिक्त चरबी जाळण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास साहाय्यक ठरते.

सेवन करण्याची योग्य पद्धत

 डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ८ ताजी पाने स्वच्छ धुवून नीट चावून खावीत. जर तुम्हाला पाने चावून खायला आवडत नसतील, तर तुम्ही त्याचा रस काढून किंवा ताकामध्ये टाकूनही घेऊ शकता. केवळ फोडणीत वापरून कढीपत्ता बाजूला काढून न टाकता, त्याचे थेट सेवन करणे आरोग्यासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरते. हा १४ दिवसांचा बदल तुमच्या जीवनशैलीत नक्कीच सकारात्मकता आणेल.

Web Title : 14 दिन करी पत्ता खाएं; ये स्वास्थ्य लाभ पाएं।

Web Summary : करी पत्ता पाचन, त्वचा, बालों के स्वास्थ्य और नियंत्रित रक्त शर्करा जैसे लाभ प्रदान करता है। डॉ. हंसाजी योगेंद्र स्वस्थ रहने के लिए रोजाना 5-8 पत्ते खाने का सुझाव देती हैं।

Web Title : Eat curry leaves for 14 days; get these health benefits.

Web Summary : Curry leaves offer benefits like improved digestion, better skin, hair health, and controlled blood sugar. Dr. Hansaji Yogendra suggests eating 5-8 leaves daily for optimal health.