Join us
Daily Top 2 Weekly Top 5

जेवण झाल्यानंतर लगेच चहा पिणं फार घातक, सवय छोटी पण शरीराचं रोज होतं भयंकर मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:29 IST

Tea After Meal Side Effects : जेवणानंतर चहा पिणं अनेकांच्या सवयीचा भाग आहे. पण त्यांना हे माहीत नसतं की, त्यांची ही सवय त्यांचं मोठं नुकसान करते. अशात जेवण झाल्यावर लगेच चहा प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे पाहूयात.

Tea After Meal Side Effects : सकाळचा आळस घालवण्यासाठी एक कप गरमागरम चहा अनेकांसाठी पुरेसा ठरतो. एक कप चहा प्यायल्याने फ्रेश वाटतं. बरेच लोक असे असतात जे केवळ सकाळी एक कप चहा पितात, तर काही लोक दिवसातून दोनवेळा, तर काही लोक दिवसातून दोनपेक्षा जास्त कप चहा पितात. काही लोकांना तर जेवण केल्यावर लगेच चहा हवा असतो. चहाने झोप उडत असेल, फ्रेश वाटत असेल पण तो पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत पाळली गेली पाहिजे. जेवणानंतर चहा पिणं अनेकांच्या सवयीचा भाग आहे. पण त्यांना हे माहीत नसतं की, त्यांची ही सवय त्यांचं मोठं नुकसान करते. अशात जेवण झाल्यावर लगेच चहा प्यायल्याने काय काय नुकसान होतात हे पाहूयात, जेणेकरून ही सवय आपण लगेच सोडाल.

जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने काय होतं? 

पचनक्रिया बिघडते

चहामधील टॅनिन आणि कॅफीनसारखे तत्व पचनक्रियेत अडथळा निर्माण करू शकतात. खासकरून भात खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने पचन तंत्र स्लो होतं आणि पोट जड वाटू शकतं. तसेच डायबिटीसच्या रूग्णांसाठी ही सवय नुकसानकारक ठरू शकते, कारण याने ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. 

मेंदूवर पडतो प्रभाव 

आपल्याला प्रश्न पडू शकतो की, साधारण चहाने मेंदूवर कसा प्रभाव पडेल? तर कॅफीनमुळे स्ट्रेस आणि ताण वाढू शकतो. त्याशिवाय पोटदुखी, अॅसिडिटी आणि अपचनसारख्या समस्याही वाढू शकतात. चहामध्ये असलेल्या फॉस्फोरिक अॅसिडने हाडांच्या आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच कॅफीनने ब्लड प्रेशर वाढू शकतं.

झोपेत अडथळा 

बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा लगेच चहा पितात आणि मग काही वेळाने झोपायला जातात. असं केल्याने झोपेत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. झोपेची गुणवत्ता सुद्धा कमी होते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, फार जास्त चहा आणि कॉफी पिणं डायबिटीसचा धोका वाढू शकतो. दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळ जास्त गोड चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने लठ्ठपणा आणि टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. यात असलेल्या सुक्रोजने लिव्हर, स्नायू आणि छोट्या आतडीवर नकारात्मक प्रभाव पडतो. चहामधील साखर कमी करणं किंवा विना साखरेचा चहा पिणं चांगला पर्याय आहे. सॉफ्ट ड्रिंक आणि जास्त गोड पेय तर नेहमीच टाळले पाहिजे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drinking tea immediately after meals is harmful; avoid it!

Web Summary : Drinking tea post-meal disrupts digestion, elevates blood sugar, and impacts sleep. Caffeine induces stress, acidity, and affects bone health. Excessive tea consumption is linked to diabetes risks. Reduce sugar intake for better health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य