Knuckle Cracking: बऱ्याच लोकांना बोटं मोडण्याची सवय असते. रिकाम्या वेळेत किंवा काही काम करत असताना लोकं बोटं मोडतात. पण जर आपण ही सवय जास्त काळ ठेवली आणि चुकीच्या पद्धतीने बोटं मोडली तर याचे गंभीर नुकसान होऊ शकतात. असं मानलं जातं की, बोटं मोडल्याने हाडं कमजोर होतात. ही एक फारच क़ॉमन सवय आहे, जी अनेकांमध्ये पाहिली जाते. पण खरंच ही सवय घातक असते का? तेच आज आपण पाहणार आहोत.
बोटं मोडल्यावर आवाज का येतो?
संशोधक सांगतात की, हाताची किंवा पायांची बोटं मोडल्यानंतर येणारा आवाज हाडं घासल्याने किंवा कार्टिलेज तुटल्यामुळे नाही तर गॅसमुळे येतो. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आलं की, जेव्हा एखादा जॉइंट खेचला तर आतील दबाव अचानक कमी होतो. यामुळे सिनोवियल फ्लूइड, जे जॉइंट्सना मुलायम बनवतं. याने एक गॅस असलेली कॅविटी तयार होते. या प्रक्रियेला ट्रायबोन्यूक्लेशन असं म्हणतात आणि यामुळे आवाज येतो.
बोटं मोडल्याने नुकसान होतं?
बोटं मोडण्याबाबत एक गैरसमज आहे की, असं केल्याने आर्थरायटिस होतो. पण शोधातून समोर आलं आहे की, डॉनल्ड अनगर नावाच्या एका डॉक्टरांनी ५० वर्ष आपल्या डाव्या हाताची बोटं मोडली आणि तर उजव्या हाताची कधीच मोडली नाही. २००४ मध्ये त्यांना दिसून आलं की, दोन्ही हातांमध्ये आर्थराइटिस किंवा जॉइंट्ससंबंधी कोणत्याही समस्येत फरक नव्हता.
गैरसमज का पसरतात?
बोटं मोडण्याबाबत नेहमीच गैरसमज होतात, कारण यामागचं विज्ञान लोकांना फारसं माहीत नसतं. पण शोधातून समोर आलं की, बोटं मोडल्याने कोणतंही नुकसान होत नाही. जर आपण ते योग्य पद्धतीने मोडले तर.
