Join us

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:17 IST

Is it good to massage feet at night: एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी तेलाने पायांची मालिश करणे. याला आयुर्वेदात 'पाद अभ्यंग' असं म्हटलं जातं.

Is it good to massage feet at night: आजकालच्या धावपळीच्या जीवनात तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. ज्याद्वारे आपण तब्येत चांगली ठेवू शकतो. असाच एक सोपा उपाय म्हणजे रात्री झोपण्याआधी तेलाने पायांची मालिश करणे. याला आयुर्वेदात 'पाद अभ्यंग' असं म्हटलं जातं. महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. अशात एक्सपर्टकडून जाणून घेऊ की, झोपण्याआधी पायांना तेल लावल्यावर काय काय फायदे मिळतात.

काय सांगतात एक्सपर्ट?

आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर डॉक्टर अल्का विजयन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओत सांगितलं की, रोज रात्री झोपण्याआधी पायांची तेलानं मालिश केल्यानं केवळ एक नाही तर अनेक फायदे मिळतात. तेच पाहुयात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डॉक्टर अल्का यांनी सांगितलं की, आपले पाय शरीरातील 72 हजार नसांसोबत जुळलेले असतात. पायांची मालिश केल्यानं थकवा तर दूर होतोच, सोबतच डोळ्यांचं देखील आरोग्य चांगलं राहतं. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, तळपायांमध्ये असे काही बिंदू असतात, ज्यांचा थेट डोळ्यांशी संबंध असतो. जेव्हा आपण या बिंदूंची रोज हलक्या हातानं तिळाचं तेल किंवा तूपानं मालिश केली, तर डोळ्यांचा थकवा कमी होतो. दृष्टी चांगली होते. डोळ्यांचा जळजळपणा, कोरडेपणा कमी होतो.

चांगली झोप

रात्री जर झोप चांगली झाली नाही तर दुसऱ्या दिवशी कामंही व्यवस्थित होत नाही. थकवा किंवा कमजोरी जाणवते. अशात यावर रात्री तेलानं पायांची मालिश करणं खूप फायदेशीर ठरतं. पायांची तेलानं मालिश केली तर शरीर आणि मेंदू शांत होतो. नसांना आराम मिळतो आणि तणावही कमी होतो. जेव्हा शरीर आणि मेंदू शांत होतो तेव्हा झोप लवकर येते आणि चांगली लागते.

एकाग्रता वाढते

डॉक्टर अल्का सांगतात की, पायांची तेलानं मालिश करणं केवळ शरीरासाठी नाही तर मेंदुसाठीही फायदेशीर ठरतं. मालिश केल्यानं मेंदुचा थकवा दूर होतो. ज्यामुळे कोणत्याही कामावर फोकस करण्यास मदत मिळते. स्मरणशक्ती वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य