Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...

तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...

what happens if we drink copper water daily : know what is the correct way to consume copper water : what happens if we drink copper water daily : benefits of drinking copper water : correct way to drink copper water : how to consume copper water properly : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताच या शारीरिक समस्या होतील दूर, पाहा पाणी पिण्याची अचूक पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 14:29 IST2025-08-22T14:16:20+5:302025-08-22T14:29:14+5:30

what happens if we drink copper water daily : know what is the correct way to consume copper water : what happens if we drink copper water daily : benefits of drinking copper water : correct way to drink copper water : how to consume copper water properly : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताच या शारीरिक समस्या होतील दूर, पाहा पाणी पिण्याची अचूक पद्धत...

what happens if we drink copper water daily benefits of drinking copper water correct way to drink copper water how to consume copper water properly | तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...

तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...

जर दिवसाची सुरुवात निरोगी व चांगल्या सवयींनी झाली, तर संपूर्ण दिवस शरीरात भरपूर ऊर्जा आणि काम करण्याचा उत्साह टिकून राहतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अशा अनेक लहान-सहान सवयींचा (know what is the correct way to consume copper water) समावेश आहे, ज्या फक्त शरीरच निरोगी ठेवत नाहीत, तर रोगांपासूनही बचाव करतात. या सवयींपैकीच एक म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सकाळी (what happens if we drink copper water daily) उपाशीपोटी पिणे.आयुर्वेदात तांब्याच्या भांड्याचे महत्त्व प्राचीन काळापासून सांगितले गेले आहे. विशेषतः रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवले आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायले, तर त्याचे शरीरावर अनेक आरोग्यदायी परिणाम दिसून येतात(how to consume copper water properly).

आपण आजी-आजोबांना सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला देताना ऐकले असेल. आता, आरोग्यतज्ज्ञ देखील याचे महत्त्व समजावून सांगत आहेत. नुकतेच, पोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. तांबे हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. या पद्धतीमुळे तांब्याचे गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते. तांब्याचे पाणी पिण्याने नेमके कोणते फायदे आपल्या शरीराला मिळतात ते पाहूयात... 

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे... 

१. ॲनिमियासाठी फायदेशीर :- जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. तांबे शरीरात लोहाचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि थकवा दूर होतो.

२. थायरॉइड :- ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी खूपच फायदेशीर ठरते. तांबे थायरॉइड हार्मोन्सना संतुलित ठेवते आणि चयापचय क्रियेचा वेग सुधारण्यास मदत करते. 

रोज सकाळी पोट नीट साफ न होण्याला कारणीभूत दिवसभरातल्या ‘या’ ६ चुका, मागे लागतं जन्मभराचं आजारपण...

३. केसांसाठी उपयुक्त :- जर तुमचे केस वेळेआधीच पांढरे होत असतील, तर रोज सकाळी तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास सुरुवात करावी. तांबे मेलेनिन (Melanin) बनवण्यास मदत करते, जे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवते. त्यामुळे, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने केसांचे अकाली पांढरे होणे थांबू शकते.

४. पचन सुधारते :- जर तुमची पचनक्रिया खराब असेल, तर उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे खूपच उपयुक्त ठरू शकते. तांब्यामध्ये हलके अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पोटाला निरोगी ठेवतात आणि गॅस व अपचनाची समस्या कमी करतात.

तांब्याच्या भांड्यातील पाणी कसे प्यावे ?

पोषणतज्ज्ञ सांगतात, रात्री (६ ते ८ तास) सुमारे ३०० मिलीलीटर पाणी तांब्याच्या भांड्यात भरून झाकून ठेवावे. सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त एक ग्लास पाणी प्या. दिवसभरात तांब्याच्या भांड्यातून एवढे पाणी पिणे पुरेसे आहे.

लघवीचा बदललेला रंग सांगतो किडनी आजारी पडतेय, ‘असा’ रंग असेल तर लगेच गाठा डॉक्टर...

या गोष्टी लक्षात ठेवा... 

१. पोषणतज्ज्ञ सांगतात, ज्या भांड्यातून तुम्ही पाणी पिता, त्यात कधीही लिंबू पाणी, व्हिनेगर, चिंच, टोमॅटोचा रस यांसारख्या आंबट गोष्टी ठेवू नका.

२. याव्यतिरिक्त, तांब्याच्या भांड्यात दूध किंवा इतर कोणतेही दुग्धजन्य पदार्थ ठेवू नका.

३. तांब्याचे भांडे दररोज लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा आणि पूर्णपणे सुकल्यावरच वापरा.

लीमा महाजन सांगतात, रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची स्वतःला लावलेली छोटीशी सवय तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकते.


Web Title: what happens if we drink copper water daily benefits of drinking copper water correct way to drink copper water how to consume copper water properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.