Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कॉफी आणि बरंच काही! पाहा रोज कॉफी प्यायली तर शरीरात काय बदल होतात?

कॉफी आणि बरंच काही! पाहा रोज कॉफी प्यायली तर शरीरात काय बदल होतात?

What happen after coffee drinking : कॉफी प्यायल्यावर ३० मिनिटांमध्ये आपल्या शरीरात काय होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:16 IST2025-07-31T11:12:27+5:302025-07-31T15:16:50+5:30

What happen after coffee drinking : कॉफी प्यायल्यावर ३० मिनिटांमध्ये आपल्या शरीरात काय होतं.

What happens after drinking coffee in the body | कॉफी आणि बरंच काही! पाहा रोज कॉफी प्यायली तर शरीरात काय बदल होतात?

कॉफी आणि बरंच काही! पाहा रोज कॉफी प्यायली तर शरीरात काय बदल होतात?

What happen after coffee drinking : भारतात चहा जरी सगळ्यात जास्त प्यायला जात असेल, पण जगभरात कॉफी सगळ्यात जास्त प्यायली जाते. भारतातही याचं प्रमाण बरंच वाढलं आहे. चहापेक्षा कॉफी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अनेक शोधांमधूनही समोर आलं आहे की, पण त्याचं प्रमाण योग्य असावं. जर योग्य प्रमाणात याचा आहारात समावेश केला तर भरपूर फायदे मिळवू शकता.

बऱ्याच रिसर्चमधून संशोधकांनी दावा केला आहे की, नियमितपणे कॉफी प्यायल्याने आयुष्य वाढतं. कारण कॉफीमध्ये हृदय निरोगी ठेवण्यासाठी, अल्झायमर टाळण्यास, मूड सुधारण्यास, मेंदू अ‍ॅक्टिव ठेवण्यास, एनर्जी मिळवण्यास इतकंच नाही तर वजन कमी करण्यासही मदत मिळते.

हे सगळं ठीक आहे. आज काही आम्ही आपल्याला कॉफीच्या फायद्यांबाबत सांगत बसणार नाही आहोत. आज आपण एक वेगळा मुद्दा समजून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की, कॉफी प्यायल्यावर ३० मिनिटांमध्ये आपल्या शरीरात काय होतं. आता आपण म्हणाला की, कॉफीने खूप फायदे मिळतात हे पुरेसं आहे. प्यायल्यावर काय होतं यात कशाला पडायचं? तर मुळात जी गोष्ट आपण खातो किंवा पितो त्याचा प्रभाव शरीरावर कसा पडतो हे आपल्याला असंच माहीत असलं तर काय वाईट आहे. म्हणून हा खटाटोप.

न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी कॉफी प्यायल्यावर ३० मिनिटांच्या आत शरीरात काय काय बदल होतात, हे सांगितले आहेत. 


बाथरूमला जावं लागेल

कॉफी प्यायल्यानंतर आपल्याला बाथरूमला जाण्याची गरज पडू शकते. याचं कारण न्यूट्रिशनिस्टनी सांगतात की, कॉफी प्यायल्यानंतर बद्धकोष्ठतेदरम्यान आपल्या आतड्यांमधील हालचाल वाढते. ज्यामुळे आपल्याला बाथरूमला जाण्याची वेळ येऊ शकते.

सक्रिय होता

तसेच कॉफी प्यायल्यावर ३० मिनिटांच्या आता आपल्या मेंदुवर प्रभाव पडतो आणि आपण अधिक सक्रिया होतो. कॉफीमधील कॅफीनने उत्तेजना मिळते. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि फोकसमध्ये सुधारणा होते.

ब्लड सर्क्युलेशन

कॉफी प्यायल्यावर हृदयात ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते. ज्यामुळे हृदय मजबूत होतं आणि निरोगी होतं. तसेच शरीरात असलेली कोणतीही सूज कमी करण्यासही कॉफी मदत करते. याच कारणाने कॉफी हृदयासाठी फायदेशीर मानली जाते.

कुणी टाळावी कॉफी?

कॉफी एकापेक्षा फायदे आहेत. पण इतके फायदे असूनही कॉफी काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. जर एन्झायटी किंवा ब्लड प्रेशरची समस्या असेल तर कॉफी पिणं टाळलं पाहिजे.

Web Title: What happens after drinking coffee in the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.