Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सोशल मीडियात कार्टिसोल फेसची प्रचंड चर्चा, चेहरा पाहून स्ट्रेस सांगणारा नवा ट्रेंड-डॉक्टर म्हणतात..

सोशल मीडियात कार्टिसोल फेसची प्रचंड चर्चा, चेहरा पाहून स्ट्रेस सांगणारा नवा ट्रेंड-डॉक्टर म्हणतात..

What Is Cortisol Face: सोशल मीडियावर कार्टिसोल फेस यावर चर्चा बघायला मिळतीये. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की, ही नेमकी काय समस्या आहे आणि कशामुळे होते? हेच आपण आज एक्सपर्टकडून समजून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:25 IST2026-02-21T12:25:21+5:302026-02-21T14:25:22+5:30

What Is Cortisol Face: सोशल मीडियावर कार्टिसोल फेस यावर चर्चा बघायला मिळतीये. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की, ही नेमकी काय समस्या आहे आणि कशामुळे होते? हेच आपण आज एक्सपर्टकडून समजून घेणार आहोत.

What exactly is the cortisol face? See what doctors say about it | सोशल मीडियात कार्टिसोल फेसची प्रचंड चर्चा, चेहरा पाहून स्ट्रेस सांगणारा नवा ट्रेंड-डॉक्टर म्हणतात..

सोशल मीडियात कार्टिसोल फेसची प्रचंड चर्चा, चेहरा पाहून स्ट्रेस सांगणारा नवा ट्रेंड-डॉक्टर म्हणतात..

What Is Cortisol Face: तब्येत आणि त्वचेसंबंधी वेगवेगळ्या गोष्टींची हल्ली सोशल मीडियावर खूप बघायला मिळतात. अनेक गोष्टी ट्रेंडही होत असतात. बरेच एक्सपर्ट आपली मते व्यक्त करत असतात. सध्या सोशल मीडियावर कार्टिसोल फेस यावर चर्चा बघायला मिळतीये. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की, ही नेमकी काय समस्या आहे आणि कशामुळे होते? हेच आपण आज एक्सपर्टकडून समजून घेणार आहोत.

कार्टिसोल हा स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखला जातो. म्हणजे जेव्हा शरीरात हे हार्मोन वाढतात, तेव्हा आपला स्ट्रेसही वाढतो. इतकंच नाही तर जेव्हा या हार्मोनची लेव्हल वाढते तेव्हा चेहऱ्यावर सूज, डलनेस आणि डार्क सर्कल अशाही समस्या दिसतात. यालाच सोशल मीडियावर कार्टिसोल फेस म्हटलं जात आहे. पण हा शब्द केवळ टिकटॉक पुरताच मर्यादीत आहे. कारण मेडिकल डिक्शनरीमध्ये या आजाराचा कोणताही उल्लेख नाही.

मून फेस आहे मुख्य कारण

अमेरिकेतली डॉक्टर ब्रायना कॉनरने Verywellmind सोबत बोलताना सांगितलं की, कार्टिसोल फेस ही एक टेंपररी कंडीशन आहे. ज्यात चेहरा जास्त स्ट्रेसमुळे गोल दिसू लागतो. ही स्थिती मुळात “Moon facies” आहे. यात चेहऱ्यावर जास्त सूज किंवा चरबी जमा होते. चेहरा गोल आणि टम्म फुगलेला दिसतो. कधीकधी चेहरा दुखतो सुद्धा. ही स्थिती एखाद्या आजाराची संकेत असू शकते जसे की, कुशिंग सिंड्रोम. ही समस्या जास्त काळ स्टेरॉइड औषधं घेतल्यानेही होते.

कधी करावी चिंता?

जर आपला चेहरा केवळ स्ट्रेसमध्ये सुजला असेल, दुखत नसेल आणि काही दिवसांनी ठीक होत असेल तर याला कार्टिसोल फेस म्हटलं जाऊ शकतं. हा स्ट्रेसचा एक सामान्य साइड इफेक्ट आहे. पण जर चेहऱ्यावर सूज सतत वाढत असेल, वेदना होत असेल सोबतच वजन वाढत असेल, कमजोरी जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

स्ट्रेस कसा दूर कराल?

जर आपण जास्त स्ट्रेसमध्ये असाल तर तो कंट्रोल करण्यासाठी मोठा श्वास घेण्याची आणि हळूवार सोडण्याचा व्यायाम करा. सोबतच इतरही व्यायाम, मेडिटेशन, चांगली झोप घेणे आणि स्क्रीन टाइम कमी करणे या गोष्टीही स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. हे लक्षात ठेवा की, जास्तीत जास्त केसेसमध्ये चेहऱ्यावर हलकी सूज केवळ तणावामुळे येते आणि ती योग्य लाइफस्टाईलने दूर करता येते.

Web Title : कोर्टिसोल फेस: क्या है? डॉक्टर सोशल मीडिया ट्रेंड समझाते हैं।

Web Summary : कोर्टिसोल फेस तनाव से जुड़ा है, जिससे चेहरे पर सूजन और काले घेरे होते हैं। यह अक्सर 'मून फैस' से संबंधित है, जहां चेहरा वसा या सूजन के कारण गोल दिखता है। व्यायाम, ध्यान और बेहतर नींद से तनाव का प्रबंधन करें। सूजन बने रहने या बिगड़ने पर डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Cortisol Face: What is it? Doctors explain the social media trend.

Web Summary : Cortisol face, linked to stress, causes facial swelling and dark circles. Often related to 'Moon facies,' where the face appears round due to fat or swelling. Manage stress with exercise, meditation, and better sleep. Consult a doctor if swelling persists or worsens.