अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम माधव नेने (Dr. Shriram nene) एक प्रसिद्ध सर्जन आहे. अलिकडेच डॉक्टर नेने हे सोशल मीडिया कंटेट क्रिएटर रणवीर यांच्या पॉडकास्टमध्ये दिसून आले. यादरम्यान रणवीर यांनी डॉक्टर नेनेंना आरोग्यासंदर्भातील काही प्रश्न विचारले. हृदय (Heart Attack) हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. हृदयाचे कार्य सुरळीत झाले नाही तर हॉर्ट अटॅकची गंभीर स्थितीसुद्धा उद्भवते. डॉ. नेने यांना हॉर्ट अटॅक आल्यानंतर शरीरात काय बदल होतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते काय म्हणाले समजून घेऊ. (Madhuri Dixit Husband Doctor Nene Told What Happen When Someone Get A Heart Attack)
हॉर्ट अटॅक आल्यानंतर काय होते? (What Happen When Someone Get A Heart Attack)
डॉ. नेने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले की हॉर्ट अटॅक आल्यानंतर ३ धमन्यांमध्ये ब्लॉकेजची समस्या होते. डाव्या धमनीत ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही. अशावेळी तो भाग काम करणं पूर्णपणे बंद करतो. हार्ट अटॅक आल्यानंतर छातीत वेदना होतात ज्या खांद्यापर्यंत पसरतात. यावेळी श्वास घ्यायला त्रास होणं, घाम येणं, ठोके जोरात होणं ही लक्षणं जाणवतात. २० टक्के रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं जाणवत नाहीत.
ज्या लोकांना लक्षणं दिसत नाहीत ते बेशुद्ध पडतात त्यांना कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते हार्ट अटॅकदरम्यान बेशुद्ध होण्याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूत ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही. यादरम्यान बेशुद्धही पडायला होते. हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाचे पंपिंग व्यवस्थित होत नाही. अशा स्थितीत व्यक्ती बेशुद्ध होते.
हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षणं काय आहेत?
हार्ट अटॅक आल्यानंतर छातीत वेदना, शरीराच्या डाव्या बाजूला वेदना, जीव घाबरल्यासारखं होणं. ही लक्षणं जाणवतात.
हार्ट अटॅक आल्यानंतर काय करायला हवं? (What Happen When You Have Heart Attack)
अटॅक आल्यानंतर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. घराच्या आजूबाजूला असलेल्या रुग्णालयात जवळपास १ तासाच्या आत जावे. १ तासाच्या आत उपचार न मिळाल्यास गंभीर स्थिती उद्भवू शकते. हार्ट अटॅकपासून बचावासाठी शरीर कायम एक्टिव्ह ठेवा. तसंच प्राणायम रोज करण्याची सवय ठेवा.