Juice to Reduce Cholesterol: खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल अनेकांच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक वाढत आहे. कोलेस्टेरॉल वाढलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे कोलेस्टेरॉल वाढल्यानं हार्ट अॅटॅक, हार्ट स्ट्रोक, डायबिटीस आणि हायपरटेंशनसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशात औषधांशिवायही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही नॅचरल ज्यूस खूप फायदेशीर ठरू शकतात. त्याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बिटाचा ज्यूस
बीट हे एक हेल्दी कंदमूळ आहे. बीट लोक जेवणासोबत सलाद म्हणून जास्त खातात. तर कधी याचे पराठे बनवले जातात किंवा ज्यूसही पितात. बिटाचा ज्यूस त्वचा नेहमीच तरूण ठेवण्यासाठी आणि शरीर आतून साफ करण्यासाठी फायदेशीर ठरतो. इतकंच नाही तर शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही बिटाचा ज्यूस मदत करतो. या ज्यूसनं स्ट्रोकचा धोका कमी होतो. यात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट, अॅंटी-इन्फ्लेमेटरी, फॉस्फोरस, व्हिटामिन बी इत्यादी गुण असतात.
कारल्याचा ज्यूस
कडू लागत असली तरी बरेच लोक कारल्याची भाजी आवडीनं खातात. तर काही लोकांना ती आवडत नाही. कारल्यामध्ये शरीरासाठी अनेक आवश्यक तत्व असतात. यात फायबर, व्हिटामिन ए, व्हिटामिन के, व्हिटामिन ई सारखे तत्व असतात. जर तुम्हाला हाय कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर याचा ज्यूस पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
दुधी भोपळ्याचा ज्यूस
दुधी भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. दुधी भोपळ्यात साधारण 98 टक्के पाणी असतं. पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी दुधी भोपळा फार फायदेशीर असतो. दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायल्यावर हार्ट स्ट्रोकचा धोका कमी होतो. तसेच याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाणही कमी होऊ शकतं.
कोरफडीचा ज्यूस
अॅलोव्हेरा म्हणजेच कोरफडीचा ज्यूस आरोग्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. हा ज्यूस पिण्यास थोडा कडवट लागू शकतो. पण याने अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. आज याचा वापर अनेक कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये म्हणजे फेस जेल, फेसवॉश, अॅलोव्हेरा पॅकेज ज्यूस बनवण्यासाठी करतात. हा ज्यूस प्यायल्यानं शुगर लेव्हल कंट्रोल होते. तसेच शरीरातील सूज कमी होते आणि हाय कोलेस्टेरॉलही कमी केलं जाऊ शकतं.
डाएटमध्ये डाळींचा करा समावेश
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या डाळींचा समावेश करावा लागेल. सर्व प्रकारच्या डाळींमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण फार कमी असतं. यात कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या फायबरचं प्रमाण जास्त असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळं असतं. अशात बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी डाळी फायदेशीर ठरू शकतात.