आपली जीभ फक्त चव ओळखण्यासाठी नसून आपल्या शरीराचा एक आरसासुद्धा आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जीभ पाहून तुमचं आरोग्य कसं आहे ते ओळखता येऊ शकतं. डॉक्टरसुद्धा रुग्णाची जीभ तपासतात. जीभेशी निगडीत काही गोष्टी माहिती करून घेतल्या तर तुम्हाला वेळीच तब्येतीची काळजी घेता येईल. योग गुरू हंसाजी योगेद्रंनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे (What Your Tongue Says About Your Health). या व्हिडिओमध्ये त्या सांगतात की जीभ पाहून शरीराच्या आत काय होतं त्या समस्यांबाबत माहिती मिळू शकते. रोज ब्रश करताना जीभेकडे लक्ष द्या. आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासही मदत होते. (What Does The Color Of Your Tongue Indicate Can Tongue color Indicate Vitamin Deficiency)
पांढरी जीभ कधी होते?
डॉक्टर हंसाजी सांगतात की तुम्हाला जिभेवर पांढरा थर दिसत असेल तर पचनशक्ती कमकुवत असण्याचं लक्षण असू शकतं. शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स जमा झाल्याचे संकेत असू शकतात. आयुर्वेदानुसार हे टॉक्सिन्सचे लक्षण आहे. अशा स्थितीत तेलकट पदार्थ खाणं टाळायला हवं, हलका फायबरयुक्त आहार घ्या.
जीभ लाल कधी होते?
योग गुरू सांगतात की तुमची जीभ लाल असले किंवा जीभेवर लाल डाग पडले असतील तर ते व्हिटामीन बी च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. याव्यतिरिक्त शरीरात इफ्लेमेशन असल्याचंही लक्षण असू शकता. याची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या भाज्या, सुका मेवा, नट्सचे सेवन करा. (Ref)
७० वर्षांचे अनुपम खेर रोज करतात हा व्यायाम; साधंसोपं फिटनेस सिक्रेट-तब्येत ठेवतं ठणठणीत
जीभेला तडे जाणं
तिसरं लक्षण आहे जिभेला तडे जाणं. हे डिहायड्रेशनचं लक्षण आहे.पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासू शकते. अशा स्थिती योग्य प्रमाणात पाणी प्या, नारळ, तूप, फळं अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.
जीभेचा रंग फिकट
जीभेचा रंग फिकट किंवा हलका असेल तर रक्ताची कमतरता भासू शकते. शरीरातील उर्जेच्या कमी प्रमाणाचा हा संकेत आहे. या स्थितीत हंसाजी योगेंद्र पालक, बीट असे आयर्नयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. योग-प्राणायम करण्याचाही सल्ला दिला जातो.
केसांचा झाडू झाला? चमचाभर तांदूळाचं पाणी 'असं केसांना लावा, डॉक्टर सांगतात दाट केसांचा उपाय
जीभ पिवळी का होते?
हंसाजी सांगतात की पिवळी जीभ म्हणजे पचनाशी संबंधित समस्या जसं की एसिडीट किंवा बॅक्टेरियाजचे संक्रमण असू शकते. अशा स्थितीत गोड, जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका,जास्तीत जास्त पाणी प्या. जर जीभेचा रंग २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ बदललेला असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्यवस्थित ब्रश करून घ्या. या छोट्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.