Foamy Urine: लघवीच्या माध्यमातून शरीरात जमा विषारी तत्व बाहेर पडतात. इतकंच नाही तर लघवीद्वारे आपल्या आरोग्याबाबत बरंच काही जाणूनही घेता येतं. जर आरोग्य चांगलं नसेल, शरीरात काही गडबड असेल तर याचे संकेत लघवीमध्ये दिसतात. खासकरून लघवीमधून जर फेस येत असेल तर याकडे लक्ष देण्याची गरज असते. फेमस आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यानी याबाबत माहिती देणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यात पोस्टमध्ये त्यानी सांगितलं की, जर लघवी करताना त्यात फेस दिसत किंवा बुडबुडे दिसत असतील याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
लघवीमधून फेस का येतो?
श्वेता शाह सांगतात की, कधी कधी लघवीतून फेस येणं सामान्य असू शकते. अनेकदा फ्लो जास्त असेल तर लघवीत फेस येतो. पण असं जर पुन्हा पुन्हा होत असेल तर याला काही गोष्टी कारणीभूत असतात.
प्रोटीन लीक
न्यूट्रिशनिस्टनुसार, जर किडनी आपलं काम योग्यपणे करत नाही, तेव्हा लघवीतून प्रोटीन येऊ लागतं. ज्यामुळे त्यात फेस तयार होतो.
डिहायड्रेशन
जर तुम्ही दिवसभर भरपूर पाणी पित नसाल तर शरीरात पाणी कमी होतं. अशात लघवी केल्यावर त्यातून फेस येतो.
यूटीआय किंवा इतर इन्फेक्शन
यूटीआय इन्फेक्शन किंवा इतर कोणतंही इन्फेक्शन झालं असेल तर लघवीतून फेस येऊ शकतो.
काय कराल उपाय?
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर तुम्हालाही लघवीमध्ये फेस दिसत असेल तर काही नॅचरल गोष्टी करून तुम्ही किडनी मजबूत करू शकता. तसेच शरीरातील विषारी तत्व बाहेर काढू शकता.
ऑइल पुलिंग
न्यूट्रिशनिस्ट सगळ्यात आधी ऑइल पुलिंग करण्याचा सल्ला देतात. यासाठी सकाळी उपाशीपोटी एक चमचा तिळाचं तेल तोंडात ठेवून ५ ते १० मिनिटं फिरवा. नंतर पाण्यानं गुरळा करा. असं केल्यानं तोंडाची स्वच्छता तर होतेच सोबतच बॉडी डिटॉक्सही होते.
हायड्रेशन बूस्ट
दिवसभर ८ ते १० ग्लास पाणी प्या. तसेच एक्सपर्ट सांगतात की, सकाळी एक ग्लास पाण्यात चिमुटभर सैंधव मीठ किंवा लिंबाचा रस टाकूनही पिऊ शकता. यानं शरीराची पीएच लेव्हल संतुलित राहते आणि किडनीचं कामही सुधारतं.
धण्याचं पाणी
किडनी निरोगी ठेवण्यासाठी आणि खासकरून यूटीआय इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी धण्याचं पाणी फायदेशीर ठरतं. यासाठी एक चमचा धणे एक ग्लास पाणी रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून पिऊ शकता.
नारळाचं पाणी
आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्टनुसार, नारळाच्या पाण्यानं शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात आणि किडनीला पोषण मिळतं. अशात नारळाच्या पाण्याचा डेली डाएटमध्ये समावेश करावा.
जवाचं पाणी
जवाच्या पाण्यानं किडनी काम सुधारतं आणि लघवीसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. यासाठी एक चमचा जव २ कप पाण्यात टाकून उकडा. नंतर हे पाणी गाळून दिवसातून १ ते २ वेळा प्या. किडनी यानं साफ होते आणि यूरिनरी सिस्टीमही शांत राहते.
त्रिफळा चूर्ण
रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात टाकून प्या. आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, असं केल्यास पचन चांगलं होतं आणि शरीरातील विषारी तत्व सहजपणे बाहेर पडतात.
श्वेता शाह सांगतात की, लघवीमधून फेस येणं किडनी खराब होत असल्याचं संकेत असू शकतो. जर वर सांगितलेले उपाय केल्यावरही लघवीतून फेस येत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा.