Join us

नखांवर पांढऱ्या, काळ्या रेषा दिसण्याची कारणं काय? दुर्लक्ष करणं पडेल महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:24 IST

Lines on nails Causes : नखांवर लाइन्स म्हणजेच रेषा दिसण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यात वय वाढणं, आरोग्यासंबंधी समस्या किंवा शरीरात पोषक तत्व कमी होणं यांचा समावेश आहे.

Lines on nails Causes : स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित कापलेल्या नखांमुळे हातांचं सौंदर्य आणखी खुलतं. पण जर नखं खराब होत असतील, तुटत असतील, पिवळे डाग दिसत असतील, काळे पडत असतील किंवा नखांवर लाइन्स दिसत असतील तर या गोष्टी चिंता करण्यासारख्या आहेत. या गोष्टींमुळे नखं तर खराब दिसतातच, सोबतच हे शरीरात काही पोषक तत्व कमी असल्याचे संकेतही असू शकतात. नखांवर लाइन्स म्हणजेच रेषा दिसण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यात वय वाढणं, आरोग्यासंबंधी समस्या किंवा शरीरात पोषक तत्व कमी होणं यांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊ नखांवर लाइन्स का दिसतात.

नखांवर लांब आणि पांढऱ्या रेषा येणं वय वाढण्याचं लक्षण असू शकतं. वाढत्या वयात शरीरात पोषक तत्व कमी होऊ लागतात. जर रेषा नखांवर अर्ध्या भागात आहेत तर हे वाढत्या वयामुळे होतं. पण जर लाइन्स डार्क असतील, नखं तुटत असतील, काळे पडत असतील तर हे आरोग्यासंबंधी संकेत असू शकतात.

उभ्या लाइन्स

जर तुमच्या नखांवर उभ्या आणि हलक्या लाइन्स असतील तर या वाढत्या वयामुळे येतात. अशा लाइन्स येणं सामान्य आहे. पण जर लाइन्स डार्क असतील आणि नखं तुटत असतील तर शरीरात काहीतरी गडबड झाल्याचा संकेत असू शकतो. अनेकदा एक्झिमा, ड्राय स्किन, हायपोथायराडिज्म यांसारख्या समस्यांमुळे नखं जाड किंवा पातळ होऊन तुटू लागतात. लायकेन प्लेनस एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यात नखांवर लाइन्स येऊ लागतात. याना ब्यू लाइन्स असंही म्हणतात. ज्या तणाव किंवा एखाद्या आजारामुळे वाढतात.

पांढऱ्या लाइन्स

पांढऱ्या लाइन्सना मेडिकल भाषेत ल्यूकोनीचिया स्ट्रिएटा म्हणतात. या लाइन्स मायक्रोट्रामा, ऑनिकोमायकोसिस किंवा आनुवांशिक आजारामुळे येतात. या लाइन्स वाढत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या.

काळ्या आणि भुरक्या लाइन्स

काही लोकांच्या नखांवर काळ्या किंवा भुरक्या लाइन्स दिसतात. याना मेलानोनीचिया असं म्हटलं जातं. नखांवर दिसणाऱ्या या लाइन्स एखादा आघात, इन्फेक्शन किंवा औषधांमुळेही येऊ शकतात.

काळ्या लाइन्स

नखांवर काळ्या लाइन्स दिसत असतील तर शरीरात व्हिटामिन सी, झिंक आणि इतर पोषक तत्व कमी झाल्याचा इशारा आहेत. आहारात या पोषक तत्वांचा समावेश करावा. पण जर नखांवरील लाइन्समधून रक्त येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

पांढऱ्या लाइन्स किंवा बेंड

या लाइन्सना मीस लाइन्स असं म्हणतात. जर तुमच्या नखांवर अशा लाइन्स दिसत असतील किंवा नखं हलके बेंड होत असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हा किडनी फेलिअरचा संकेत असू शकतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स