Iron-Deficiency : शरीरात रक्त कमी झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसू लागतात. काही लोकांना नेहमीच सर्दी होत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. अशात शरीरात हीमोग्लोबिन कमी होऊ नये लाइफस्टाईलमध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. हेल्थ एक्सपर्टनुसार, रक्त कमी झाल्यावर शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जर वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर घातक ठरू शकतं. शरीरात व्हिटॅमिन सी कमी झाल्यावर नेहमीच सर्दी होते. अशात वेळीच या लक्षणाकडे लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे.
शरीरात रक्त कमी झाल्यावर चक्कर येणे, कमजोरी आणि बेशुद्ध पडणे अशा समस्या होतात. याचं कारण जेव्हा शरीरात लाल रक्त पेशी सामान्यापेक्षा कमी होतात, तेव्हा शरीरात रक्त कमी होतं. अशात एनीमियाची समस्या होते. शरीरात रक्त कमी झाल्यावर जर वेळीच उपचार घेतले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. एनीमिया झाल्यावर शरीरात आयर्न कमी होतं. अशात शरीरात रक्त कमी झाल्यावर काय काय लक्षणं दिसतात हे जाणून घेऊ.
रक्त कमी झाल्याची लक्षणं
१) कमजोरी जाणवणं
२) चक्कर येणे
३) श्वास घेण्यास समस्या
४) डोकंदुखी आणि हाय-पाय थंड होणं
५) बेशुद्ध पडणं
६) सतत थकवा येणं
काय कराल उपाय?
१) पालक
शरीरात आयर्नची कमतरता झाल्यावर रक्त कमी होऊ लागतं. अशात तुम्ही तुमच्या आहारात पालकचा समावेश करायला हवा. पालकमध्ये भरपूर आयर्न असतं. पालक खाऊन शरीरात रक्त वाढतं.
२) टोमॅटो
जर तुम्ही एनीमियाचे शिकार असाल तर आहारात टोमॅटोचा समावेश करायला हवा. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर ठरतात. तुम्ही टोमॅटो सलाद, सूप किंवा भाजी बनवून खाऊ शकता.
३) केळी
शरीरात जर रक्त कमी झालं असेल तर रोज एक केळ खायला हवं. केळ्यात भरपूर प्रमाणात आयर्न आणि पोटॅशिअम असतं. केळी खाऊन रक्ताची कमतरता दूर केली जाऊ शकते.
४) मनुके
शरीरात जर रक्त कमी झालं असेल तर रोज ४ ते ५ मनुके दुधात टाकून उकडा. दूध कोमट झाल्यावर प्या. हवं तर तुम्ही मनुके टाकलेलं दूध दिवसातून दोन वेळा पिऊ शकता. मनुक्याच्या मदतीनं शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत मिळते.