Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आपण पाणी कमी पितोय हे कसं कळेल? शरीरात काय दिसतात लक्षणं आणि काय कराल उपाय

आपण पाणी कमी पितोय हे कसं कळेल? शरीरात काय दिसतात लक्षणं आणि काय कराल उपाय

Water Deficiency Symptoms : आपण काही लोकांकडून नेहमीच ऐकत असतो की, कामाच्या व्यापामुळे त्यांना पाणी पिण्याची देखील फुरसत मिळत नाही. त्यामुळे बरेच लोक दिवसाला कसेबसे अर्धा लिटर पाणी पितात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:34 IST2025-12-01T10:33:34+5:302025-12-01T10:34:43+5:30

Water Deficiency Symptoms : आपण काही लोकांकडून नेहमीच ऐकत असतो की, कामाच्या व्यापामुळे त्यांना पाणी पिण्याची देखील फुरसत मिळत नाही. त्यामुळे बरेच लोक दिवसाला कसेबसे अर्धा लिटर पाणी पितात.

What are the symptoms of drinking less water | आपण पाणी कमी पितोय हे कसं कळेल? शरीरात काय दिसतात लक्षणं आणि काय कराल उपाय

आपण पाणी कमी पितोय हे कसं कळेल? शरीरात काय दिसतात लक्षणं आणि काय कराल उपाय

Water Deficiency Symptoms : आजच्या धावपळीच्या आयुष्यात, सततचा स्क्रीन टाइम आणि ‘डूम स्क्रोलिंग’मुळे आपल्या पाणी पिण्याच्या प्रमाणात भरपूर कमतरता येते. त्यात थंडीच्या दिवसातही तहान कमी लागते. आपण काही लोकांकडून नेहमीच ऐकत असतो की, कामाच्या व्यापामुळे त्यांना पाणी पिण्याची देखील फुरसत मिळत नाही. त्यामुळे बरेच लोक दिवसाला कसेबसे अर्धा लिटर पाणी पितात.

2025 च्या Dehydration Statistics Report नुसार जगभरातील साधारण 16-21% लोक रोज डिहायड्रेशनचे शिकार होतात. संशोधन सांगतं की, पाण्याची ही दिसायला छोटी वाटणारी कमतरताही शरीरावर मोठा परिणाम करते. अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात शरीरात पाणी कमी झालं हे कसं ओळखावं आणि त्यावर काय उपाय करावे हे आज आपण पाहणार आहोत.
रिपोर्टनुसार, जर एखादी व्यक्ती दिवसाला फक्त 500 ml पाणी पित असेल, तर शरीर लगेच माइल्ड ते मॉडरेट डिहायड्रेशनमध्ये जातं. रिसर्चनुसार अशा वेळी शरीर सेल्समधील पाणी ओढून घेतं, त्यामुळे थकवा, चक्कर, डोकेदुखी, बद्धकोष्ठता ही लक्षणं वाढू शकतात.

पाणी कमी पिल्याने कोणत्या समस्या होतात?

ओठ कोरडे पडणे व त्यातून रक्त येणे

तीव्र थकवा व एनर्जी कमी होणे

त्वचा कोरडी होणे

गोड किंवा खारट खाण्याची इच्छा वाढणे

लघवीचा रंग गडद पिवळा येणे

लघवी करताना जळजळ होणे

मेंदू व मूडवर परिणाम

क्लिनिकल रिसर्चनुसार शरीरातील फक्त 1–2% पाण्याची कमतरता सुद्धा मेंदूवर परिणाम करते. अशात लक्ष केंद्रीत करण्यात अडचण, स्मरणशक्ती कमजोर होणे, चिडचिड व थकवा, डोकेदुखी वाढणे अशा समस्या होतात. MRI स्टडीमध्ये दिसले आहे की डिहायड्रेशनमुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे साध्या कामातही अधिक मेहनत वाटते.

शरीर पाणी मागत आहे हे कसे ओळखावे?

गडद पिवळी लघवी

दिवसात 3–4 वेळांपेक्षा कमी लघवी

चक्कर, थकवा, कोरडे ओठ

हृदयाचे ठोके वाढणे किंवा कमी BP

हायड्रेटेड राहण्यासाठी सोपे उपाय

थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्या

सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाणी

पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा

कलिंगड, संत्रे, काकडी यांसारखी पाण्याने भरपूर फळे/भाज्या आहारात ठेवा.

Web Title : डिहाइड्रेशन को पहचानें: लक्षण, खतरे और दैनिक जीवन के सरल उपाय।

Web Summary : हल्का डिहाइड्रेशन ऊर्जा, फोकस और मूड को प्रभावित करता है। गहरे रंग का मूत्र, थकान और सूखे होंठों पर ध्यान दें। बार-बार पानी पिएं, बोतल साथ रखें और तरबूज जैसे हाइड्रेटिंग फल खाएं।

Web Title : Recognize Dehydration: Symptoms, risks, and simple hydration solutions for daily life.

Web Summary : Mild dehydration impacts energy, focus, and mood. Watch for dark urine, fatigue, and dry lips. Drink water frequently, carry a bottle, and eat hydrating fruits like watermelon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.