Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटातून सारखा गुडगुड आवाज येतो? तज्ज्ञ सांगतात त्यामागची कारणं, आवाजाकडे दुर्लक्ष नकोच कारण....

पोटातून सारखा गुडगुड आवाज येतो? तज्ज्ञ सांगतात त्यामागची कारणं, आवाजाकडे दुर्लक्ष नकोच कारण....

Home Remedies To Stop Stomach Growling: पोटातून गुडगुड आवाज सारखाच येत असेल तर ते काही बरं लक्षण नाही. बघा तो आवाज का येतो, आणि काय त्यावरचा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 09:08 AM2024-05-21T09:08:33+5:302024-05-21T09:10:01+5:30

Home Remedies To Stop Stomach Growling: पोटातून गुडगुड आवाज सारखाच येत असेल तर ते काही बरं लक्षण नाही. बघा तो आवाज का येतो, आणि काय त्यावरचा उपाय...

what are the reasons of stomach growling? how to stop stomach growling? | पोटातून सारखा गुडगुड आवाज येतो? तज्ज्ञ सांगतात त्यामागची कारणं, आवाजाकडे दुर्लक्ष नकोच कारण....

पोटातून सारखा गुडगुड आवाज येतो? तज्ज्ञ सांगतात त्यामागची कारणं, आवाजाकडे दुर्लक्ष नकोच कारण....

Highlightsआवाज मात्र मोठा असेल आणि वारंवार येत असेल तर ते पचनासंबंधी एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं.....

जेवण झालं की त्याच्यानंतर पुढच्या एक- दोन तासांत किंवा जेवणानंतर काही वेळात लगेच अनेक जणांच्या पोटातून गुडगूड आवाज येऊ लागतो. कधी कधी तो आवाज अगदी लहान असतो त्यामुळे तो फक्त आपल्यालाच ऐकू येतो. पण काही जणांच्या बाबतीत असंही होतं की तो आवाज मोठा असतो. आणि वारंवार येतो. त्यामुळे मग जेव्हा आपण मिटिंगमध्ये असतो, ऑफिसमध्ये असतो किंवा अशा एखाद्या ठिकाणी असतो जिथे शांतता आहे, पण आपल्या बाजुला बरेच लोक आहेत, तिथे तो आवाज जोरात येतो (what are the reasons of stomach growling?). अगदी आजुबाजुच्या लोकांनाही तो ऐकू येतो आणि मग सगळ्यांमध्ये आपण हास्यास्पद होऊन जातो. (how to stop stomach growling?)

 

अशी आपली फजिती नेहमीच होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा आवाज अगदी एखाद्यावेळी किंवा बारीक असेल तर पचनक्रियेचा तो एक भाग म्हणून सोडून द्या.

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

ती बाब काही खूप गांभिर्याने घेण्याची गरज नाही, पण आवाज मात्र मोठा असेल आणि वारंवार येत असेल तर ते पचनासंबंधी एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं अशी माहिती डॉ. इमरान अहमद यांनी झी न्यूज इंडियाशी बोलताना दिली. त्यामुळे वारंवार ही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून एकदा तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी सुचविले आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत भूक लागली असेल तरीही असा आवाज येतो, असंही डॉक्टर म्हणाले. 

 

पोटातून गुडगुड आवाज येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

१. तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण योग्य आहे का हे एकदा तपासून घ्या आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे सुरू करा.

पोळी, पराठ्यांना तूप लावून भाजताना 'ही' चूक करणं आरोग्यासाठी घातक! बघा तुमचंही चुकतंय का

२. नेहमीच खूप जास्त जेवण करणे किंवा खूप उपाशी राहाणे टाळा. थोड्या थोड्या वेळाने खात राहा.

३. दिवसातून दोन ते तीन वेळा हर्बल टी घेऊन पाहा. 

 

Web Title: what are the reasons of stomach growling? how to stop stomach growling?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.