Join us

पाय आणि कंबरेच्या दुखण्याला सामान्य समजता? किडनीच्या 'या' आजाराचे असू शकतात संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:02 IST

Kidney Disease Sign : अलिकडे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना किडनी स्टोनची (Kidney Stone) समस्याही होत आहे.

Kidney Disease Sign : बरेच लोक रोजच्या बिझी शेड्युलमुळे आपल्या आरोग्याकडे हवं तसं लक्ष देऊ शकत नाही. ज्यामुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. ज्यात किडनीच्या आजारांचा देखील समावेश आहे. किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी आहे. किडनीद्वारे रक्त फिल्टर केलं जातं आणि शरीराची सफाई केली जाते. अशात जर किडनीमध्ये जराही काही समस्या झाली तर शरीरात अनेक समस्या होऊ शकतात. 

तसेच अलिकडे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना किडनी स्टोनची (Kidney Stone) समस्याही होत आहे. ही समस्या खूप वेदनादायी असते. जर या समस्येची लक्षणं वेळीच ओळखली तर त्रास लगेच कमी करता येऊ शकतो. आज आपण किडनी स्टोनची काही लक्षणं (Kidney Stone Signs) समजून घेणार आहोत, ज्यांना सामान्य समजण्याची चूक अजिबात करू नये.

किडनी स्टोन काय आहे?

किडनी स्टोन हे छोट्या छोट्या खड्यांसारखे असतात, जे मुत्रमार्गात तयार होतात. सामान्यपणे स्टोन लघवीद्वारे निघून जातात, पण जेव्हा ते निघतात तेव्हा खूप वेदना होतात. जर स्टोन आपोआप बाहेर निघत नसतील किंवा लघवीत अडथळा निर्माण करत असतील, तेव्हा ते तोडावे लागतात किंवा सर्जरी करून काढावे लागतात.

कसे तयार होतात स्टोन?

स्टोन हे मिनरल्स, अॅसिड आणि सॉल्ट मिळून किडनीमध्ये तयार होतात. हे कधी छोटे तर कधी मोठ्या आकारांचेही असतात. किडनी स्टोन लहान असतील तर आपल्याला त्यांचं अस्तित्व किंवा ते निघून गेल्याचेही कळत नाही. पण तर स्टोन मूत्रमार्गात अडकून राहिले तर किडनीच्या कामातही अडथळा निर्माण होतो.

किडनी स्टोनची लक्षणं

कंबर, पोट किंवा ओटीपोटात वेदना

मांड्या आणि पायांमध्ये वेदना

उलटी येणे

लघवीतून रक्त येणे

लघवी करताना जळजळ किंवा वेदना

लघवीचा स्पीड कमी होणे

पुन्हा पुन्हा लघवी लागणे

ताप येणे किंवा थंडी वाजणे

लघवीमधून दुर्गंधी

किडनी स्टोन होण्याची कारणं

लघवीमध्ये मिनरल्स, अ‍ॅसिड आणि इतरही तत्व असतात. जसे की, कॅल्शिअम, सोडिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अ‍ॅसिड. जर ही तत्व जास्त प्रमाणात जमा झालीत आणि शरीरात पाणी कमी झालं तर ही तत्व एकत्र येतात आणि स्टोन तयार होतात.

कुणाला असतो जास्त धोका?

जे लोक पाणी कमी पितात, जास्त मांस खातात, प्रोटीन जास्त घेतात, मीठ आणि साखर जास्त खातात, व्हिटामिन सी चे सप्लीमेंट जास्त घेतात अशांना किडनी स्टोनचा धोका अधिक असतो. तसेच जर घरात आधी कुणाला किडनी स्टोनची समस्या झाली असेल तर त्यांनाही हा धोका असतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य