Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नाभीत बदामाचं तेल घालण्याचा काय फायदा होतो? पाहा एक्सपर्ट काय सांगतात

नाभीत बदामाचं तेल घालण्याचा काय फायदा होतो? पाहा एक्सपर्ट काय सांगतात

Benefits of Oiling in navel : अनेकांना हे माहीत नसतं की, नाभीमध्ये तेल टाकल्यानं काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:37 IST2025-09-18T11:27:46+5:302025-09-18T12:37:56+5:30

Benefits of Oiling in navel : अनेकांना हे माहीत नसतं की, नाभीमध्ये तेल टाकल्यानं काय होतं?

What are the exact benefits of putting almond oil in the navel? See what experts say | नाभीत बदामाचं तेल घालण्याचा काय फायदा होतो? पाहा एक्सपर्ट काय सांगतात

नाभीत बदामाचं तेल घालण्याचा काय फायदा होतो? पाहा एक्सपर्ट काय सांगतात

Benefits of Oiling in navel :  बरेच लोक अंग दुखत असेल, पाय दुखत असेल तर तेलानं मालिश करतात. तेलानं हा एक जुना उपाय आहे. तेलानं जर शरीराची मालिश केली तर शरीराला पोषण मिळतं आणि वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. शरीराची तेलानं मालिश करणं कॉमन आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, नाभीमध्ये तेल टाकल्यानं काय होतं. तेच आज आपण पाहणार आहोत. इतकंच नाही तर नाभीसाठी कोणतं तेल जास्त फायदेशीर ठरेल हेही आपण पाहुयात.

नाभीसाठी कोणतं तेल फायदेशीर?

नाभीमध्ये तेल टाकण्याचे फायदे अनेक आहेत, पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोणतं तेल अधिक फायदेशीर ठरेल किंवा कोणतं नाही. प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेन्द्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी नाभीमध्ये बदामाचं तेल टाकण्याचे फायदे सांगितले आहेत.
हंसाजी सांगतात की, जर आपली झोप पूर्ण होत नसेल, रात्री झोपमोड होत असेल किंवा नेहमीच अस्वस्थ वाटत असेल तर नाभीमध्ये बदामाचं तेल टाकावं. झोपण्याआधी 2 ते 3 थेंब कोमट बदामाचं तेल नाभीत टाका आणि हलक्या हातानं मसाज करा. यानं शरीराला आराम मिळेल आणि मेंदूही शांत होईल. तसेच या तेलानं तणाव कमी होईल आणि झोपही चांगली लागेल.

नाभीमध्ये तेल टाकण्याचे फायदे

- लोक शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची खूप काळजी घेतात. पण नाभीच्या स्वच्छतेवर फारचं लक्ष दिलं जात नाही. नाभीमध्ये हजारो घातक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. नाभीमध्ये तेल टाकलं तर कीटाणू आणि घाणीपासून सुटका मिळते. तसेच पोट आणि वेगवेगळ्या समस्यांपासून बचावही होतो.

- जर तुम्हाला चमकदार चेहरा आणि चांगली त्वचा हवी असेल तर नाभीची मालिश करा आणि त्यावर नियमितपणे तेल लावा.  तेल लावल्याने तुमचं रक्त शुद्ध होतं, तसेच शरीरातील विषारी पदार्थही दूर होतात. 

- कडूलिंबाचं तेल, गुलाबाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा लिंबू मिक्स करून नाभीवर लावू शकता. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात.

- मोहरीच्या तेलाने वेगवेगळे फायदे होतात. मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही बॅक्टेरिया दूर करू शकता. हे तेल इतकं फायदेशीर असतं की, या तेलाने पुन्हा बॅक्टेरियाही येत नाही.

- जर तुम्हाला पोटाच्या वेगवेगळ्या समस्या, पोट फुगणे किंवा मळमळ होणे अशा समस्या असेल तर नाभीमध्ये मोहरीचं तेल आणि आल्याचं मिश्रण लावल्याने या समस्या दूर होऊ शकतात. 

नाभीमध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया

2012 मध्ये पीएलओएस वनमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आपल्या एकट्या नाभीमध्ये 2, 368 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. यातील अनेक म्हणजे 1,458 प्रजाती वैज्ञानिकांसाठी नव्या आहेत. इथे सगळ्यात जास्त घाम येतो. नाभी स्वच्छ करणंही सोपं नसतं. कारण आत खड्डा असतो. त्यामुळे यातून दुर्गंधी येते आणि इथे बॅक्टेरिया वाढतात.

Web Title: What are the exact benefits of putting almond oil in the navel? See what experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.