Frequent Urine Reason: शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लघवी होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जर पाणी प्यायल्यानंतर दर १५ मिनिटांनी तुम्हाला वॉशरूमला जीवं लागत असेल, तर ही बाब चिंतेची ठरू शकते. बरेच लोक ही सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण अशा वेळी यामागची कारणे आणि त्यावर उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.
पाणी प्यायल्यानंतर वारंवार लघवी लागण्याचे कारण काय?
ही समस्या अनेकदा ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडरमुळे होते. या स्थितीत मूत्राशयाच्या स्नायूंमध्ये गरजेपेक्षा जास्त वेळा आकुंचन पावण्याची क्रिया होते. त्यामुळे मूत्राशय पूर्ण भरलेला नसतानाही वारंवार लघवी लागल्यासारखे वाटते.
इतर काही कारणे
मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI)
जास्त प्रमाणात कॅफिन किंवा मद्य सेवनामुळे होणारी चिडचिड
शुगर नियंत्रणात नसणे
ताणतणाव किंवा चिंता
यावर काय करावे?
सर्वप्रथम तुम्ही किती प्रमाणात आणि किती वेगाने पाणी किंवा इतर द्रव पदार्थ पिता, याकडे लक्ष द्या. चहा, कॉफी आणि फिजी ड्रिंक्स हे मूत्राशयावर दबाव निर्माण करू शकतात, त्यामुळे त्यांचं सेवन मर्यादित ठेवणं आवश्यक आहे.
तसेच, अगदी थोड्या वेळात वारंवार बाथरूमला जाण्याची सवय टाळा आणि ठराविक वेळेच्या अंतराने लघवी करण्याचा प्रयत्न करा. यासोबतच पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज केल्यास मूत्राशयावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
दिवसातून किती वेळा लघवी सामान्य?
एका वेबसाईटला डॉ. भानु मिश्रा यांनी सांगितलं की, दिवसभरातून किती वेळा लघवी करणं सामान्य मानलं जातं, हे व्यक्तीचं वय, पाणी पिण्याचं प्रमाण, फिजिकल अॅक्टिविटी आणि आरोग्यावर अवलंबून असतं. सामान्यपणे एका हेल्दी व्यक्तीला दिवसातून ६ ते ८ वेळा लघवी लागणं सामान्य आहे. तेच काही लोकांसाठी ही संख्या ४ ते १० दरम्यान असणं सामान्य असू शकतं. तेही जर त्यांना काहीच समस्या होत नसेल तरच.
गंभीर आजाराचा संकेत
जर फार जास्त वेळ जसे की, दिवसातून १० पेक्षा जास्त वेळ किंवा रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल तर हा आरोग्यासंबंधी काही समस्यांचा संकेत असू शकतो. डॉक्टर सांगतात की, पुन्हा पुन्हा लघवी येण्याच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीस, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन(UTI) ओव्हरअॅक्टिव ब्लॅडर सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ(पुरूषांमध्ये) किंवा जास्त कॅफीन-लिक्विड इनटेक करणं यांचा समावेश आहे.
तेच फार कमी लघवी येणं म्हणजे दिवसभरातून ३ पेक्षा कमी वेळ लघवी लागणं किंवा लघवीमध्ये अडथळा होणं डिहायड्रेशन, किडनी फेलिअर, यूरिनरी ब्लॉकेज किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट असण्याचा संकेत असू शकतो. जर लघवी करताना जळजळ होत असेल, वेदना होत असेल, रक्त येत अशेल किंवा दुर्गंधी येत असेल तर हा इन्फेक्शन किंवा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.
Web Summary : Frequent urination after drinking water may indicate an overactive bladder, UTI, or excessive caffeine intake. Monitor fluid intake, limit bladder irritants, and practice pelvic floor exercises. Consult a doctor if urination is excessively frequent, painful, or accompanied by blood.
Web Summary : पानी पीने के बाद बार-बार पेशाब आना ओवरएक्टिव ब्लैडर, यूटीआई या अत्यधिक कैफीन सेवन का संकेत हो सकता है। तरल पदार्थ का सेवन देखें, मूत्राशय को उत्तेजित करने वाली चीजों को सीमित करें और पेल्विक फ्लोर व्यायाम करें। अगर पेशाब अत्यधिक बार आता है, दर्द होता है या खून आता है तो डॉक्टर से सलाह लें।