अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या फिटनेसबाबत चर्चेत असतात. त्यांचे फॅन्सही त्यांचं फिटनेस रूटीन जाणून घेण्यासाठी ते फॉलो करण्यासाठी उत्सुक असतात. अशात आपण अनेकदा ऐकलं असेल की, जास्तीत जास्त सेलेब्स आपल्या सकाळच्या रूटीनमध्ये तूपाचा समावेश करतात. अनेक हेल्थ एक्सपर्ट सु्द्धा सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खाण्याचा सल्ला देत असतात. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, कृति सेनन, मलायका अरोरा या अभिनेत्री सकाळी तूप खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खाल्ल्याने काय होतं. अशात डॉ. शुभम वात्स्या यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
पचन तंत्रासाठी फायदेशीर
तूप आपल्या पोटातील आतला थर जो आहे तो मुलायम करतो. यात ब्यूटिरिक अॅसिड भरपूर असतं, ज्याने आतडीची सूजही कमी होते आणि पचन व्यवस्थितपणे होतं. जर आपल्याला नेहमीच बद्धकोष्ठतेची समस्या राहत असेल म्हणजे पोट साफ होत नसेल तर तूप अशात लूब्रिकंटचं काम करतं. ज्यामुळे पोट लगेच साफ होतं.
चमकदार त्वचा आणि मजबूत केस
रोज जर आपण सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खाल्ल्यास शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. हे पोटात एका नॅचरल मॉइश्चरायजरसारखं काम करतं. ज्यामुळे त्वचेची चमक वाढते आणि कोरडेपणाही दूर होतो. तसेच केसांना तूपाने भरपूर पोषण मिळतं. ज्यामुळे केस मजबूत होतात.
मेटाबॉलिज्म आणि वजन नियंत्रण
सामान्य समजुतीच्या उलट, योग्य प्रमाणात तूप सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तूप शरीरातील हट्टी चरबी शोषून ती जाळण्यास मदत करते. तसेच तूप खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे अनावश्यक कॅलरी घेणं टाळता येतं.
सांधेदुखीवर आराम
तूप हे सांध्यांसाठी नैसर्गिक ल्युब्रिकंटसारखं काम करतं. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स शरीरातील कमतरता भरून काढतात आणि हाडांमधील घर्षण कमी करतात. त्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.
मानसिक सतर्कता आणि ऊर्जा
मेंदूचा सुमारे 60% भाग चरबीपासून बनलेला असतो. तुपामधील चांगले फॅट्स मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करतात.
तूप कसं घ्यावं?
सुरूवातीला सकाळी उपाशीपोटी एक चमच्याऐवजी अर्धा चमचा तूप घ्या. तूप घेतल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या किंवा एक ग्लास कोमट पाण्यात टाकूनही तूप घेऊ शकता. तूप घेतल्यानंतर साधारण ३० ते ४० मिनिटं काहीही खाऊ नका.
