पावसाळ्यात केसांची काळजी घेणे फार गरजेचे असते. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे केस वारंवार ओले होतात आणि त्यामुळे डोकं दुखण्याचा त्रास होतो. (wet hair means cold, cough, fever, hair care tips , always follow these steps during monsoon)पावसाचं पाणी जर थेट डोक्यावर पडलं आणि केस तसेच राहीले तर सर्दी, शिंका, डोकं दुखणं यासारख्या समस्या उद्भवतात. यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी आणि उपाय नियमित केल्यास केसही सुरक्षित राहतील आणि आरोग्यावर परिणाम होणार नाही.
पावसाळ्यात घराबाहेर पडताना पावसाचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. छत्री किंवा रेनकोट नेहमी जवळ ठेवावा. विशेषतः महिलांनी ओले केस बांधून ठेवणं टाळावं कारण त्यामुळे डोक्यावर पडलेले पाणी तसेच राहते. आणि केसातच साठून राहते. केस ओले झाल्यावर थेट पंख्याखाली उभं राहण्याची सवय फार वाईट आहे. केस पहिले कोरडे करायचे. पाणी पुसून टाका आणि केस कोरडे करा. वाऱ्यावर केस वाळवल्यामुळे डोकं दुखतं.
पावसाळ्यात केस धुतल्यानंतर लगेच बाहेर पडणं टाळावं. ओल्या केसांवर धूळ, प्रदूषण आणि आर्द्र हवामानाचा परिणाम जास्त होतो. केसा वर पाणी पडल्यावर ते जोरात झटकू नका. केस सुकवताना केस जोरात चोळूही नयेत. त्याऐवजी टॉवेलने हलक्या हाताने दाबून सुकवावेत. पावसाळ्यात केस धुण्याचे प्रमाण कमी ठेवावे. केस धुतल्यानंतर संपूर्ण सुकल्याशिवाय केस बांधू नयेत. पावसाळ्यात उठसुठ गार पाण्याने अंघोळ करु नये. सर्दी जाता जात नाही. गरम कोमट पाणी घ्या. केसाला फार गरम पाणी लावू नये म्हणून जरा कोमट पाणी घ्यायचे.
रात्री झोपताना केस कधीही ओले ठेवू नयेत. ओल्या केसांनी झोपल्यास सर्दी होते. शक्यतो झोपण्यापूर्वी केस पूर्ण सुकवावेत. मुळात रात्रीचे केस धुणे टाळण्याचा प्रयत्न करा. नाईलाज असेल तर वाळवून मग झोपा. केसांची काळजी फक्त सौंदर्यासाठीच घ्यायची नसते. तर आरोग्य चांगले राहावे यासाठीही केसांची काळजी घ्यावी. पावसाळ्यात ही काळजी अधिक घेतल्यास डोकेदुखी, सर्दी आणि केसांचे काही त्रास टाळता येतात.