Shower after Meal: आयुर्वेदात आपल्या रोजच्या जगण्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करणं किंवा न कऱणं आरोग्यासाठी चांगलं असतं हे सांगण्यात आलं आहे. पाणी पिण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत महत्वाच्या गोष्टी यात देण्यात आल्या आहेत. भरपूर लोक फिट आणि निरोगी राहण्यासाठी या गोष्टी फॉलो करतात. पण आजकालच्या बिझी लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या चुका करतात. ज्यामुळे त्यांना आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक चूक म्हणजे जेवण केल्यावर लगेच आंघोळीला जाणं. पण ही सवय फारच चुकीची आणि नुकसानकारक आहे. चला तर पाहुयात जेवण झाल्यावर लगेच आंघोळ का करू नये आणि असं केल्यास काय होतं.
ब्लड फ्लो
जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा शरीरातील जास्तीत जास्त ब्लड डायजेस्टिव सिस्टीमकडे फ्लो होतं, जेणेकरून पचन चांगलं व्हावं. पण जर जेवण झाल्यावर लगेच आंघोळ करत असाल तर शरीराचं तापमान अचानक कमी होतं आणि ब्लड स्किनकडे जातं. ज्यामुळे पचन तंत्राला कमी रक्त पुरवठा होतो. अशात अन्न पचन होण्यास समस्या होते.
पचनक्रिया स्लो होते
थंड पाण्यानं आंघोळ केल्यावर शरीराचं तापमान अचानक कमी होतं, ज्यामुळे मेटाबॉलिज्म थोड्या वेळासाठी स्लो होतं. याचा थेट प्रभाव पचनावर पडतो. ज्यामुळे अॅसिडिटी, गॅस, जडपणा आणि अपचन अशा समस्या होऊ शकतात.
थकवा आणि सुस्ती
डायजेस्टिव सिस्टीममध्ये शरीराला आधीच एनर्जीची गरज असते. अशात जर जेवण झाल्यावर आंघोळ केल्यास जास्त थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.
कधी करावी आंघोळ?
आयुर्वेद आणि अनेक हेल्थ एक्सपर्ट हेच सांगतात की, जेवणाच्या कमीत कमी ३० ते ४५ मिनिटांनंतर आंघोळ करू शकता. यादरम्यान पचन तंत्राला आपलं काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तसेच शरीरावर अधिकचा दबाव पडत नाही. आपण असंही करू शकता की, आंघोळ केल्यावर जेवण करा.