Join us   

डोकं फार ठणकतं? १ सोपा उपाय, डोकेदुखीपासून मिळेल आराम-डोकेदुखी होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 2:00 PM

Ways to Get Rid of a Headache Quickly : हा उपाय तुम्ही ऑफिसमध्ये असताना किंवा घरी कुठेही करू शकता.

रोजच्या स्ट्रेसफूल रुटीनमध्ये अनेकांना डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.  एकदा डोकं दुखू लागलं की अनेकदा प्रयत्न करूनही हा त्रास थांबत  नाही. कधी एकदा बरं वाटले असं वाटतं.  जरा डोकं दुखलं की घे गोळी अशी सवय अनेकांना असते. पण अति प्रमाणात गोळ्या घेतल्याने तब्येतीचं नुकसान होऊ शकतं आणि त्याचे साईड इफेक्ट्सही उद्भवणार नाहीत.  काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे डोकेदुखीपासून काही मिनिटांत आराम मिळेल. हा उपाय तुम्ही ऑफिसमध्ये असताना किंवा घरी कुठेही करू शकता. (Ways to Get Rid of a Headache Quickly)

डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठी सगळ्यात आधी कानांचा खालचा भाग दोन्ही हातांनी ८ ते १० वेळा हळूवार ट्विस्ट करा. जवळपास १ मिनिटं ही क्रिया करा. त्यानंतर वरच्या बाजूने कान ओढून परत खाली न्या. एक मिनिटं हा व्यायाम करा. नंतर तोंड उघडा आणि बंद करा ही क्रिया २ ते ३ वेळा करा.  हा उपाय केल्यास डोकेदुखीपासून त्वरीत आराम मिळेल. ( Remedies to Get Rid of Headaches Naturally)

 

डोकेदुखीपासून आराम मिळवण्याचे इतर उपाय

डिहायड्रेशन आणि एसिटीडीमुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार डिहायड्रेशनमुळे लोकांची विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे डोकं दुखू लागतं. जर तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास  होत असेल तर  १ ग्लास पाणी प्या. याशिवाय फळं, स्मूदी , सूप  पिऊन तुम्ही शरीरातील पाण्याची कमतरता दूर करू शकता.

चेहऱ्यावर तेज नाही, डल-उदास-निस्तेज दिसतोय चेहरा? ४ सोपे उपाय, आठवड्यातभरात येईल चेहऱ्यावर चमक 

हर्बल टी

पब मेड सेंट्रेलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधानुसार आल्याचा चहा डोकेदुखीपासून आराम देण्यात फायदेशीर ठरतो. उकळत्या पाण्यात अर्धा चमचा आल्याची पावडर किंवा ताजं आलं घालून चहा करा.

फूड एलर्जी

अनेकदा  अशा काही पदार्थांचा आपण आहारात समावेश करतो ज्यामुळे एलर्जी होते आणि डोकं दुखतं.  तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर त्वरीत असा आहार घेणं सोडा. 

हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

केस बांधले असतील तर सोडा

अनेकदा डोकेदुखी दबावामुळे उद्भवते. डोक्यावर दबाब आल्यामुळे नसा ताणल्याप्रमाणे वाटतं. पोनीटेल, बन, टोपी किंवा हेअर बॅण्डमुळे डोकं दुखतं.  म्हणूनच डोकेदुखी उद्भवल्यास लगेच या गोष्टी डोक्यावर काढा. ज्यामुळे आराम मिळेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य