Kidney Disease Sign : किडनी आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव असून त्या शरीराला फिल्टर करण्याचं काम करतात. रक्तातील टॉक्सिन्स आणि अनावश्यक द्रव्ये बाहेर काढण्याचं काम किडनी करतात. जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसतात. त्यापैकी काही थेट डोळ्यांवर जाणवतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या गंभीर होऊ शकते. अशात डोळ्यात किडनीमध्ये बिघाड असल्याची काय लक्षणं दिसतात हे माहीत असणं आवश्यक आहे.
डोळ्यांच्या आसपास सूज
डोळ्यांच्या खाली किंवा पापण्यांभोवती सूज येणे हे किडनी डॅमेजचे सर्वात सामान्य संकेत आहे. किडनी नीट काम न केल्यास रक्तात प्रोटीनची मात्रा कमी होते. यामुळे द्रव त्वचेच्या ऊतींमध्ये जमा होतं आणि डोळ्यांभोवती फुगल्यासारखे दिसू लागते.
डोळ्यांजवळ किंवा पापण्यांमध्ये खाज
सतत डोळ्यात खाज येणे किंवा लालसरपणा दिसणे हेही किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते. किडनी खराब झाल्यावर शरीरात टॉक्सिन्स आणि यूरिया वाढतो. या साठलेल्या विषारी पदार्थांमुळे युरेमिक प्रुरिटस नावाची स्थिती निर्माण होते, ज्यामुळे डोळे आणि त्वचा दोन्ही सतत खाजतात.
धूसर दिसणे
अचानक धुसर दिसू लागणे हे उच्च रक्तदाबाचे (High BP) संकेत असू शकते. किडनी खराब झाल्यावर BP वाढण्याची शक्यता जास्त असते. जास्त BP मुळे डोळ्यांतील नसांवर ताण येतो व त्या खराब होऊ लागतात. यामुळे रेटिनोपॅथी होऊ शकते, ज्यात दृष्टी धुसर दिसू लागते.
