Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुखरी कंबर-ठणकतं डोकं आणि पित्तानं मळमळ, ऑटो इम्यून आजारही वाढले- घरोघर महिला ३ गोष्टींमुळे आजारी

दुखरी कंबर-ठणकतं डोकं आणि पित्तानं मळमळ, ऑटो इम्यून आजारही वाढले- घरोघर महिला ३ गोष्टींमुळे आजारी

waist hurts, headache and nausea due to bile, autoimmune diseases also increased - women in every household are sick due to 3 things : कुणाही बाईला विचारा तिचं काहीतरी दुखतच असतं, पण घरचे म्हणतात काय सारखं बरं नाही म्हणत रडते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 16:13 IST2026-01-22T16:10:59+5:302026-01-22T16:13:35+5:30

waist hurts, headache and nausea due to bile, autoimmune diseases also increased - women in every household are sick due to 3 things : कुणाही बाईला विचारा तिचं काहीतरी दुखतच असतं, पण घरचे म्हणतात काय सारखं बरं नाही म्हणत रडते!

waist hurts, headache and nausea due to bile, autoimmune diseases also increased - women in every household are sick due to 3 things | दुखरी कंबर-ठणकतं डोकं आणि पित्तानं मळमळ, ऑटो इम्यून आजारही वाढले- घरोघर महिला ३ गोष्टींमुळे आजारी

दुखरी कंबर-ठणकतं डोकं आणि पित्तानं मळमळ, ऑटो इम्यून आजारही वाढले- घरोघर महिला ३ गोष्टींमुळे आजारी

- मयूरा घोडके

काय सारखी कुरकुर करते, कसं काय तुझं सतत काहीना काही दुखतं?
असं म्हणून घरोघर बायकांना नावं ठेवली जातात. तिचं ना सतत काहीतरी दुखतंच, असंही म्हटलं जातं.
जे खरंच असतं. बायकांची तब्येत बिघडण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्तच असतं.
पण, ते का? याचा शोध घ्यायचा तर बरीच उत्तरं सापडतील.
पण, आताचं ताजं कारण असं आहे की प्रचंड प्रमाणातलं प्रदूषण, प्रवासाचा वाढता वेळ, चुकीची जीवनशैली आणि त्यात वाढलेला गारठा यानं महिलांची तब्येत पुरुषांपेक्षा जास्त बिघडते आहे. महिलांना होणाऱ्या ऑटोइम्यून आजारात वाढ झालेली आहे.
म्हणजेच प्रतिकारशक्तीसंदर्भातले आजार वाढलेले आहेत.


दिल्लीस्थित एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी याला दुजोरा दिलेला आहे. एम्सच्या रुमटॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. उमा कुमर यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. प्रदूषणामुळे होणारे संसर्ग तर आहेतच; पण, त्यासोबत महिलांचं वाढलेलं वजन, चुकीची जीवनशैली, आहाराकडे पूर्णत: दुर्लक्ष, यामुळेही महिलांचे ऑटोइम्यून ट्रान्स मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
महिलांची त्यांच्या वाढत्या वजनावरून टिंगल होते. अनेक जणी तर वजन कमी करण्यासाठी म्हणून क्रॅश डाएट करतात. त्यात आहारातून योग्य पोषण मिळत नाही. हाडं दुखतात. त्यात प्रदूषण, प्रवास, अपुरी झोप, वाढलेला मानसिक तणाव यामुळे महिलांना होणारे ऑटोइम्यून ट्रान्स वाढलेले आहेत.
...आणि ते गंभीर आहे
महिलांनी स्वत:ची आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणं ही प्राथमिकता असली पाहिजे; पण, घरोघर महिला स्वत:ची सोडून इतर सर्वांची काळजी घेतात.
अनेकदा आजार अंगावर काढतच दिवस ढकलतात.
हे चित्र बदललं नाही, तर मानसिक, शारीरिक आजारपण महिलांची पाठ सोडणार नाही.

Web Title : कमर दर्द, सिरदर्द, ऑटोइम्यून रोग जीवनशैली के कारण महिलाओं को परेशान करते हैं

Web Summary : प्रदूषण, यात्रा और खराब जीवनशैली महिलाओं के स्वास्थ्य को बदतर करते हैं, जिससे ऑटोइम्यून रोग बढ़ते हैं। विशेषज्ञ महिलाओं के लिए आत्म-देखभाल के महत्व पर जोर देते हैं, जिसे अक्सर वे दूसरों की भलाई को प्राथमिकता देते हुए अनदेखा कर देती हैं। स्वास्थ्य संबंधी समस्याओं की अनदेखी मानसिक और शारीरिक बीमारियों की ओर ले जाती है।

Web Title : Aching Back, Headaches, Autoimmune Diseases Plague Women Due to Lifestyle

Web Summary : Pollution, travel, and poor lifestyle worsen women's health, increasing autoimmune diseases. Experts emphasize the importance of self-care for women, often neglected as they prioritize others' well-being. Ignoring health issues leads to mental and physical ailments.