Join us   

कोण म्हणतं व्हिटामीन डी फक्त उन्हातूनच मिळतं? 'हे' ५ पदार्थ खा, हाडं होतील बळकट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 3:44 PM

Vitamin D Deficiency Foods : एक ग्लास दूध पिऊन हाडं मजबूत ठेवू शकता. हे एक नॅच्युरल ड्रिंक आहे. व्हिटामीन डी बरोबर कॅल्शियम असते.

व्हिटामीन डी शरीराच्या चांगल्या विकासासाठी आणि हाडांना स्ट्राँग बनवण्यासाठी फार महत्वाचा आहे.  (Health Tips) व्हिटामीन डी हाडांबरोबरच दातांच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते. व्हिटामीन कॅल्शियम, फॉस्फेटच्या संरक्षणात बदल करतात ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. (Complete Your Vitamin D Deficiency In Summer Season With These 5  Foods)

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होत जातात. याशिवाय ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. व्हिटामीन डी चा प्राकृतिक स्त्रोत सुर्याची किरणं आहेत. पण उन्हाळ्यात  उन्हात बसणं शक्य नसते. अशावेळी तुम्ही व्हिटामीन डी ची  कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.  (Vitamin D Deficiency In Summer Season)

गाईच्या दुधापासून बनलेल्या दह्याचे सेवन केल्याने शरीराला व्हिटामीन डी मिळते. शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासू नये यासाठी ताज्या दह्याचे सेवन करायला हवं. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. याव्यतिरिक्त दूध, पनीर आणि  योगर्ट व्हिटामीन डी चा चांगला स्त्रोत आहेत.

पालक

पालकात  वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटामीन्स असतात. त्यात व्हिटामीन डी असते पालकात प्रोटीन्स, आयर्न, व्हिटामीन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात पालकात अल्फा लिपोइक एसिड असते. हे एक प्रकारचे एंटीऑक्सिडेंट आहे ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.

गाजर

व्हिटामीन डी साठी आहारात  गाजराचा समावेश करा. यात व्हिटामीन सी बरोबरच इतर पोषक  तत्व असतता. गाजरात फॅट्सचे प्रमाण अजिबात नसते. म्हणूनच वेट लॉसमध्येही मदत होते. 

संत्र्याचा ज्यूस

संत्र्याच्या रस व्हिटामीन सी ने परिपूर्ण असतो. बाजारात काही फोर्टिफाईड ऑरेंज ज्यूस मिळतात. ज्यात व्हिटामीन डी सुद्धा  असते. हा रस पिऊन तुम्ही शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता.

दूध

एक ग्लास दूध पिऊन हाडं मजबूत ठेवू शकता. हे एक नॅच्युरल ड्रिंक आहे. व्हिटामीन डी बरोबर कॅल्शियम असते. युएसजीएच्या रिपोर्टनुसार १०० एमएलल दूधात ५१ आईयू व्हिटामीन डी आणि ११३ एमजी कॅल्शियम असते.

मशरूम

शाकाहारी लोकांसाठी मशरूम एक हाय व्हिटामीन डी फूड आहे.  मशरूमच्या सेवनाने शरीराला व्हिटामीन डी मिळण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य