शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी, योग्य आहार असणं सर्वात महत्वाचं मानलं जातं. आरोग्य तज्ञ म्हणतात की, आपल्याला नियमित आहाराद्वारे पोषक तत्वांची आवश्यकता असते. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी आणि डी सारख्या पोषक तत्वांची नियमितपणे आवश्यकता असते, त्यांच्या कमतरतेमुळे विविध गोष्टी होऊ शकतात. विशेषतः व्हिटॅमिन डी, कारण त्याची कमतरता हाडांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. तुम्हाला अनेकदा मूड स्विंग्स आणि सतत स्ट्रेस येत असेल तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक
मेडिकल रिपोर्ट्सवरून, मानसिक आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन डी मूड, ऊर्जा आणि झोप सुधारून मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतं आणि डिप्रेशनचा धोका कमी करतं. व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना नैराश्य, स्किझोफ्रेनिया आणि ऑटिझम सारख्या मानसिक आजारांचा धोका असू शकतो.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूड स्विंग्स
मेंदूच्या कार्यासाठी आणि सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, जो चांगला मूड राखण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हार्मोन आहे. त्याच्या कमतरतेमुळे मूडशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. तुम्हाला वारंवार मूड स्विंग, चिंता किंवा डिप्रेशनचा त्रास देखील होऊ शकतो. जर तुम्हालाही अशा समस्या वारंवार येत असतील, तर तज्ञांचा सल्ला घ्या.
स्नायूंमध्ये वेदना व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना अनेकदा स्नायूंच्या वेदनांची समस्या असते. बरेच लोक असं गृहीत धरतात की, ही सामान्य थकवा किंवा वृद्धत्वामुळे होणारी समस्या आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की व्हिटॅमिन डी स्नायूंच्या कार्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतं आणि त्याच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणं आणि दीर्घकालीन वेदना होऊ शकतात.
केस गळण्याची समस्या
व्हिटॅमिन डीची कमतरता तुमच्या केसांसाठीही चांगली नाही.जर तुमचे केस खूप गळत असतील आणि सर्व उपाय करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल, तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. त्याच्या कमतरतेमुळे अलोपेशिया एरिटा सारख्या गंभीर केसांच्या समस्या उद्भवू शकतात. केस निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे.