Join us

व्हायरल ट्रेंडसाठी वाया घालवण्यापेक्षा रोज प्या हळदीचं पाणी, पावसाळ्यात तर फार आवश्यक कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:35 IST

Benefits of Drinking Turmeric Water: निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. यातीलच एक पद्धत म्हणजे रोज सकाळी उपाशीपोटी हळदीचं पाणी पिणे.

Turmeric Water Health Benefits: सध्या सोशल मीडियावर हळदीची चांगली चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर टर्मरीक ग्लो ट्रेंड (Turmeric Glow Trend) चर्चेत आहे. जगभरातील लोक हा ट्रेण्ड फॉलो करत आहेत. त्यामुळे हळदीच्या वेगवेगळ्या गोष्टींची सुद्धा चर्चा केली जात आहे. मीम्सही व्हायरल झाले आहेत. तुम्ही पाहिलं असेल की, की लोक मोबाइलचा लाइट ऑन करून त्यावर काचेचा ग्लास ठेवून त्यात हळद टाकतात. हे दिसायला भारी वाटतं. पण या लेखात आम्ही तुम्हाला या ट्रेण्डबाबत काही सांगत नाही आहोत. आम्ही तुम्हाला या ट्रेण्डच्या निमित्तानं हळदीचं पाणी पिण्याचे फायदे सांगत आहोत. 

हळद घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांना रंग देण्यासाठी आणि त्यांची टेस्ट वाढवण्यासाठी वापरली जाते. मात्र, हळद पदार्थांना टेस्ट आणि रंग देणारा मसाला नाही तर एक प्रभावी औषधी आहे. आयुर्वेदात हळदीला फार पूर्वीपासून एक औषधी मानलं जातं. आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. यातीलच एक पद्धत म्हणजे रोज सकाळी उपाशीपोटी हळदीचं पाणी पिणे. अशात हळदीचं पाणी प्यायल्यानं काय काय फायदे होतात हे जाणून घेऊ. (टर्मरीक ग्लो ट्रेण्डबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा)

हळदीचं पाणी कसं फायदेशीर?

हळदीतील मुख्य तत्व करक्यूमिन आहे. जो एक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी पदार्थ आहे. हे तत्व शरीरात फ्री रॅडिकल्ससोबत लढतं. फ्री रॅडिकल्सनं सेल्सचं नुकसान होतं आणि अनेक आजारांचा धोका वाढतो. तसेच करक्यूमिन सूज कमी करण्यास मदत करतं.

रोज हळदीचं पाणी पिण्याचे फायदे

इम्यूनिटी वाढते

हळदीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरल दुण असतात, जे इम्यून पॉवर मजबूत करतात. यामुळे सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळते.

पचन तंत्र मजबूत राहतं

हळदीमधील तत्व पचनासाठी आवश्यक एंझाइम्सचं उत्पादन वाढवतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. तसेच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर होतात.

त्वचेसाठी फायदेशीर

हळदीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेचा फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होऊ शकतो. तसेच हळदीनं त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.

हृदयासाठी फायदेशीर

हळद केवळ पोट आणि त्वचेसाठी फायदेशीर नाही तर यानं हृदय देखील निरोगी राहतं. कारण हळदीतील तत्वांमुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं आणि बॅड कोलेस्टेरॉल लेव्हलही कमी होते.

मेंदूसाठी फायदेशीर

हळदीच्या मदतीनं मेंदूतील सूज कमी होऊन स्मरणशक्ती आणि फोकस वाढतो. तसेच हळदीनं अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या आजारांचा धोका कमी करण्यासही मदत मिळते.

वजन होतं कमी

हळदीमधील तत्वांमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

हळदीचं पाणी कसं बनवाल?

हळदीचं पाणी तयार करणं फार सोपं आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर टाकून पिऊ शकता. हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावं. हवं तर तुम्ही यात थोडी काळी मिरी पूडही घालू शकता. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नसोशल व्हायरल