Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी खा ३ भाज्या! डायबिटीस राहील नियंत्रणात - वजनही वाढणार नाही...

फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी खा ३ भाज्या! डायबिटीस राहील नियंत्रणात - वजनही वाढणार नाही...

Vegetables to control fasting sugar : Best vegetables for diabetes patients : 3 Vegetables Help In Controlling Fasting Sugar : फास्टिंग शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या भाज्या असायलाच हव्यात ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2025 12:12 IST2025-09-04T12:03:09+5:302025-09-04T12:12:50+5:30

Vegetables to control fasting sugar : Best vegetables for diabetes patients : 3 Vegetables Help In Controlling Fasting Sugar : फास्टिंग शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या भाज्या असायलाच हव्यात ते पाहा...

Vegetables to control fasting sugar Best vegetables for diabetes patients 3 Vegetables Help In Controlling Fasting Sugar | फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी खा ३ भाज्या! डायबिटीस राहील नियंत्रणात - वजनही वाढणार नाही...

फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी खा ३ भाज्या! डायबिटीस राहील नियंत्रणात - वजनही वाढणार नाही...

डायबिटीस हा सध्या एक फारच कॉमन असा आजार झाला आहे. अगदी लहान वयातच डायबिटीस झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. डायबिटीस म्हटलं की अगदी मोजून मापून खाण्याची सवय लावावी लागते, खाण्यावर निर्बंध येतात. डायबिटीस असल्यावर आपण रक्तातील साखरेची पातळी (fasting sugar) नियंत्रणात ठेवण्यासाठी, काय खातो हे खूप महत्त्वाचे असते. विशेषतः नाश्ता (Best vegetables for diabetes patients) हा आपल्या दिवसातील पहिला आणि महत्त्वाचा आहार असतो. अनेकदा आपण नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. मात्र, जर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये काही विशिष्ट भाज्यांचा समावेश केला, तर आपल्या रक्तातील साखर कमी ( 3 Vegetables Help In Controlling Fasting Sugar) ठेवण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते(Vegetables to control fasting sugar)

आपल्या आहारात अशा काही भाज्यांचा समावेश आपण करु शकतो, ज्या फास्टिंग शुगर कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या भाज्या फक्त स्वादिष्टच नाहीत, तर त्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे (vitamins) आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक रक्तातील साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करतात आणि शरीराला इन्सुलिनचा योग्य वापर करण्यासाठी मदत करतात. या भाज्यांचा वापर करून आपण केवळ रक्तातील साखरच नियंत्रणात ठेवू शकत नाही, तर एकूणच आरोग्यासाठीही त्या फायदेशीर ठरतात. सकाळच्या नाश्त्यातील काही पौष्टिक भाज्या फक्त पोटच भरत नाही तर शरीराला आवश्यक असलेले फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे देऊन पचनक्रियाही सुधारतात. त्यामुळे फास्टिंग शुगर कमी करायची असेल, तर सकाळच्या नाश्त्यात काही विशिष्ट भाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. फास्टिंग शुगर नियंत्रणात ठेवण्यास नाश्त्यात योग्य भाज्यांचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते, शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

फास्टिंग शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या ३ भाज्या खाव्यात? 

१. शेवगा :- शेवगा ही एक अशी भाजी आहे, जी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. शेवग्याच्या झाडाची पाने, फुले आणि मुळांचा उपयोग केला जातो. ही भाजी मधुमेहाच्या (Diabetes) नियंत्रणासाठी उपयुक्त मानली जाते. शेवगा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करते. शेवग्याच्या पानांमध्ये असे काही घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रोजच्या आहारात शेवग्याचा समावेश केल्याने मधुमेहाशी संबंधित शरीरातील गुंतागुंत टाळण्यासही मदत मिळू शकते. फायबर, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (minerals) यांनी समृद्ध असलेली ही भाजी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

२. दुधी - भोपळा :- दुधी भोपळा डायबिटीसच्या रुग्णांसाठी सुपरफूड मानले जाते. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, त्यामुळे दुधी - भोपळा  खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. फायबरयुक्त असलेला दुधी भोपळा पचनक्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो. नाश्त्यामध्ये नियमितपणे दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

३. कोबी :- मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांसाठी कोबी हा फारच फायदेशीर व गुणकारी मानला जातो. आपण आहारात कोबीच्या भाजीचा समावेश करतो परंतु डायबिटीजसाठी कोबीची पाने अधिक फायदेशीर मानली जातात. कोबीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ती खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढत नाही. तसेच, कोबीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन 'सी' (vitamin C) भरपूर प्रमाणात असते. हे घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि मधुमेहाची गुंतागुंत कमी करू शकतात. कोबी शिजवून किंवा सॅलडच्या रूपात खाल्ली जाऊ शकते.

 

Web Title: Vegetables to control fasting sugar Best vegetables for diabetes patients 3 Vegetables Help In Controlling Fasting Sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.