Join us
Daily Top 2 Weekly Top 5

UTI सतत झाल्यानं किडनी निकामी होण्याचा धोका, लघवीचं इन्फेक्शन अंगावर काढणं फार घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:45 IST

UTI can damage Kidney : जर यूटीआयवर वेळीच उपचार केले नाही तर किडनी पूर्णपणे डॅमेज होऊ शकते. अशात आपल्याला डायलीसिस आणि ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते.

UTI can damage Kidney : यूटीआय म्हणजेच यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ही एक अशी स्थिती आहे, ज्यात जास्तीत जास्त लोक सुरूवातीला फार गंभीरतेने घेत नाहीत. सामान्यपणे हे इन्फेक्शन ब्लॅडरपर्यंत मर्यादित राहतं. पण जेव्हा बॅक्टेरिया शरीरातील इतर भागात पसरतात, तेव्हा ते किडनीसाठी फार घातक ठरू शकतात. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जर यूटीआयवर वेळीच उपचार केले नाही तर किडनी पूर्णपणे डॅमेज होऊ शकते. अशात आपल्याला डायलीसिस आणि ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते.   

यूटीआयमुळे किडनी डॅमेजचा धोका कसा?

एक्सपर्ट सांगतात की, जेव्हा इन्फेक्शनवर लगेच उपाय केले जात नाहीत, तेव्हा घातक बॅक्टेरिया खालून वरच्या दिशेने म्हणजे किडनीकडे येऊ लागतात. इन्फेक्शन जेव्हा किडनीपर्यंत पोहोचतं, त्या स्थितीला पायलोनेफ्रायटिस म्हटलं जात. या स्थितीत रूग्णाला ताप, थरथरी, पाठीच्या मागच्या भागात वेदना आणि उलटी अशी लक्षणे जाणवतात. याचा अर्थ हा आहे की, इन्फेक्शन साधं राहिलेलं नाही. याने किडनीचं काम प्रभावित झालंय.  

किडनीवर जखम

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, जास्त काळ यूटीआय इन्फेक्शन राहिल्याने किडनीच्या टिश्यूजवर जखम होऊ शकते. ज्यामुळे किडनीची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. अशात हाय ब्लड प्रेशरची समस्या तर वाढतेच, सोबतच किडनीच्या आजाराही धोकाही असतो. काही केसेसमध्ये इन्फेक्शन रक्तातही पसरू शकतं, जे जीवघेणं ठरू शकतं. 

यूटीआयपासून बचावाचे उपाय   

यूटीआय इन्फेक्शन टाळण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्यावं. पाण्यामुळे इन्फेक्शन शरीरातून बाहेर निघून जातं. सोबतच स्वच्छता ठेवा. जास्तवेळ लघवी रोखून ठेवू नका. जर लघवी करताना नेहमीच जळजळ होत असेल, पुन्हा पुन्हा लघवी येत असेल किंवा पोटाच्या खालच्या भागात प्रेशर जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

English
हिंदी सारांश
Web Title : UTI: When does it risk kidney damage? Don't ignore these symptoms!

Web Summary : Untreated UTIs can spread to kidneys, causing severe damage and potential kidney failure. Symptoms like fever, back pain, and frequent urination should not be ignored. Drink plenty of water and maintain hygiene to prevent UTIs.
टॅग्स : स्त्रियांचे आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स