Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पाहावं तेव्हा कानात हेडफोन, गळ्यात वायरींच्या माळा, कान फुटतील-ऐन तारुण्यात लोक होत आहेत बहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 18:26 IST

Using headphones all the time? your ears will explode - people are becoming deaf in their youth : कान खराब होतील सतत हेडफोन्स वापरल्यामुळे.

चालायला जाताना, प्रवासात, गाडी चालवताना किंवा अगदी भांडी घासतानाही आजकाल कनात हेडफोन्स घालणे अगदीच कॉमन आहे. त्याशिवाय चुकल्यासारखे वाटते. हे यंत्र वापरण्याची सवय म्हणजे एक प्रकारचं अॅडिक्शनच आहे. (Using headphones all the time? your ears will explode - people are becoming deaf in their youth.)कारण एखादा दिवस हेडफोन्स घरी विसरलो तर दिवसभर अस्वस्थ व्हायला होतं. मात्र याचा सारखा वापर करणे आरोग्यासाठी फार त्रासाचे आहे. आजकाल मोबाइल, लॅपटॉप आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. गाणी ऐकणे, वेबसीरिज पाहणे, ऑनलाईन मीटिंग्स किंवा गेमिंग प्रत्येक गोष्टीसाठी कानात हेडफोन्स असतातच. पण सतत आणि दीर्घकाळ हेडफोन्स वापरण्याचे कानांवर काही गंभीर परिणाम होऊ शकतात, हे अनेकांना माहिती नसते.

सर्वात मोठा धोका म्हणजे श्रवणशक्ती कमी होणे. मोठ्या आवाजात दीर्घकाळ गाणी ऐकल्यास कानातील सूक्ष्म पेशींवर ताण येतो. या पेशी एकदा खराब झाल्या की त्या पुन्हा तयार होत नाहीत. त्यामुळे हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. दुसरा परिणाम म्हणजे कानदुखी आणि दाब जाणवणे. कानात सतत इअरफोन्स ठेवल्याने आतल्या भागावर दाब पडतो. विशेषतः इन-इअर प्रकारचे इअरफोन्स जास्त वेळ वापरल्यास कानाच्या आतील त्वचा सेंसिटिव्ह होते आणि वेदना जाणवू शकतात. सतत हेडफोन्स वापरल्याने कानात संसर्ग होण्याचाही धोका वाढतो. इअरफोन्स स्वच्छ न ठेवल्यास त्यावर जंतू जमा होतात. हे जंतू कानात गेल्यास खाज, सूज, पस किंवा वेदना होऊ शकतात. घाम आणि ओलावा साचल्याने बॅक्टेरिया वाढण्यास पोषक वातावरण तयार होते.

याशिवाय मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यास लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. काही लोकांना चिडचिड, झोप न लागणे किंवा तणाव जाणवतो. तज्ज्ञांच्या मते, ६०/६० नियम पाळणे फायदेशीर ठरते. म्हणजेच आवाजाची पातळी ६० टक्क्यांपेक्षा कमी ठेवणे आणि सलग ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ हेडफोन्स न वापरणे. मध्ये मध्ये कानांना विश्रांती देणे आवश्यक आहे. हेडफोन्स वापरणे पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्याचा वापर मर्यादित ठेवणे आणि आवाजाची पातळी नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण कानांची काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम कायमस्वरुपी राहू शकतात. योग्य सवयी लावल्या तर आपण तंत्रज्ञानाचा आनंदही घेऊ शकतो आणि कानांचे आरोग्यही जपू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Headphone addiction causing hearing loss, deafness in youth: Experts warn.

Web Summary : Constant headphone use harms hearing. High volume damages ear cells, causing hearing loss, pain, and infections. Experts recommend the 60/60 rule: limit volume and usage.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यसोशल व्हायरलसोशल मीडिया