Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > इयरफोन्स कायम कानात असतातच? पाहा ते वापरताना काय काळजी घ्यायची, ज्यामुळे कान कायम सुरक्षित राहतील

इयरफोन्स कायम कानात असतातच? पाहा ते वापरताना काय काळजी घ्यायची, ज्यामुळे कान कायम सुरक्षित राहतील

Using Earphones All Day? Essential Tips to Keep Your Ears Safe and Healthy forever : सतत कानात इअरफोन्स असतील तर लक्षात ठेवा या गोष्टी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2026 15:14 IST2026-03-29T15:12:17+5:302026-03-29T15:14:23+5:30

Using Earphones All Day? Essential Tips to Keep Your Ears Safe and Healthy forever : सतत कानात इअरफोन्स असतील तर लक्षात ठेवा या गोष्टी.

Using Earphones All Day? Essential Tips to Keep Your Ears Safe and Healthy forever | इयरफोन्स कायम कानात असतातच? पाहा ते वापरताना काय काळजी घ्यायची, ज्यामुळे कान कायम सुरक्षित राहतील

इयरफोन्स कायम कानात असतातच? पाहा ते वापरताना काय काळजी घ्यायची, ज्यामुळे कान कायम सुरक्षित राहतील

आजकाल मोबाइल, ऑनलाइन काम, गाणी किंवा व्हिडिओ पाहताना हेडफोन्स किंवा इयरफोन्स वापरण्याची सवय अनेकांना लागली आहे. ही सवय सोयीची असली तरी योग्य काळजी घेतली नाही तर ती कानांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे इयरफोन वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाजाची पातळी. (Using Earphones All Day? Essential Tips to Keep Your Ears Safe and Healthy forever )अनेक जण मोठ्या आवाजात गाणी ऐकतात, पण सतत जास्त आवाजात ऐकल्यास कानातील नाजूक पेशींवर ताण येतो. यामुळे हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे नेहमी मध्यम आवाजातच इयरफोन वापरावा. तज्ज्ञांच्या मते, ६० - ६० नियम पाळणे योग्य ठरते, म्हणजे ६० टक्के आवाजावर आणि सलग ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर टाळावा.

इयरफोनची स्वच्छता ही दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इयरफोन्स सतत कानात घातल्याने त्यावर मळ, घाम आणि बॅक्टेरिया जमा होतात. हेच इयरफोन पुन्हा वापरल्यास कानात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा इयरफोन स्वच्छ करणे आवश्यक आहे. सॉफ्ट कापड वापरुन बाहेरील भाग हलक्या हाताने पुसावा. इयरबड्सचे सिलिकॉन कव्हर काढून वेगळे धुवावे आणि पूर्ण कोरडे झाल्यावरच पुन्हा वापरावे. दीर्घकाळ सतत इयरफोन वापरणेही टाळावे. बराच वेळ कान बंद राहिल्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे घाम व ओलावा वाढतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. म्हणूनच काही वेळाने इयरफोन काढून कानांना विश्रांती देणे गरजेचे आहे. विशेषतः झोपताना इयरफोन लावण्याची सवय टाळावी, कारण यामुळे कानांवर दाब येतो आणि नुकसान होऊ शकते.

इयरफोन इतरांबरोबर शेअर करणे टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कानातील बॅक्टेरिया वेगवेगळे असतात. इयरफोन शेअर केल्यास हे जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो आपले इयरफोन स्वतःपुरतेच वापरावेत. कानांची स्वच्छता करताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे. काडी किंवा टोकदार वस्तू वापरून कान साफ करणे टाळावे, कारण यामुळे कानाच्या आतल्या भागाला इजा होऊ शकते. जर कानात खाज, वेदना किंवा आवाज येण्यास त्रास होत असेल, तर स्वतः उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
 

Web Title : ईयरफोन सुरक्षा: इन ज़रूरी सुझावों से अपने कानों को सुरक्षित रखें।

Web Summary : ईयरफोन इस्तेमाल करते समय सावधानी बरतें। मध्यम आवाज रखें, उपयोग 60 मिनट तक सीमित करें और संक्रमण से बचने के लिए नियमित रूप से साफ करें। ईयरफोन साझा करने से बचें और कान की समस्याओं के लिए डॉक्टर से सलाह लें। अपनी कान की सेहत को प्राथमिकता दें।

Web Title : Earphone Safety: Protect your ears with these essential usage tips.

Web Summary : Using earphones requires caution. Maintain moderate volume, limit usage to 60 minutes, and clean them regularly to prevent infections. Avoid sharing earphones and consult a doctor for ear issues. Prioritize your ear health.