Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > युरिक ॲसिड वाढलं-किडनी स्टोनचा त्रास? ४ गोष्टी करा- किडनीच्या आजारांचा धोका टाळा

युरिक ॲसिड वाढलं-किडनी स्टोनचा त्रास? ४ गोष्टी करा- किडनीच्या आजारांचा धोका टाळा

Uric Acid : जेव्हा हे शरीरात खूप जास्त वाढतं आणि किडनी त्याला बाहेर काढू शकत नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, किडनी स्टोन.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:07 IST2025-06-27T10:58:04+5:302025-06-27T19:07:05+5:30

Uric Acid : जेव्हा हे शरीरात खूप जास्त वाढतं आणि किडनी त्याला बाहेर काढू शकत नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, किडनी स्टोन.

Uric acid may cause of kidney stones know how to get rid of uric acid | युरिक ॲसिड वाढलं-किडनी स्टोनचा त्रास? ४ गोष्टी करा- किडनीच्या आजारांचा धोका टाळा

युरिक ॲसिड वाढलं-किडनी स्टोनचा त्रास? ४ गोष्टी करा- किडनीच्या आजारांचा धोका टाळा

Uric Acid : यूरिक अ‍ॅसिड शरीरात तयार होणारं एक घातक केमिकल आहे. जेव्हा तुम्ही असे पदार्थ खाता ज्यात प्यूरिन नावाचं तत्व असतं, जसे की, लाल मांस, मासे, डाळी, बीअर आणि काही भाज्या यातील प्यूरिन तुटून यूरिक अ‍ॅसिड बनतं. तसं तर यूरिक अ‍ॅसिड रक्तात मिक्स होऊन किडनीच्या माध्यमातून लघवीद्वारे बाहेर निघतं. पण जेव्हा हे शरीरात खूप जास्त वाढतं आणि किडनी त्याला बाहेर काढू शकत नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, किडनी स्टोन.

किडनी स्टोन

जास्त यूरिक अ‍ॅसिड किडनीमध्ये जमा होऊन स्टोन बनवू शकतं, जे फार त्रासदायक ठरतं. जर यूरिक अ‍ॅसिड बऱ्याच दिवसांपासून वाढलेलं असेल तर यानं किडनीचं मोठं नुकसान होऊ शकतं. इतकंच नाही तर किडनी फेल होण्याचाही धोका असतो. ज्या लोकांमध्ये यूरिक अ‍ॅसिड जास्त असतं, त्यांना टाइप-२ डायबिटीस, लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉल अशा गोष्टींचाही धोका असतो. अशात काही उपाय करून तुम्ही यूरिक अ‍ॅसिड कमी करू शकता.

पाणी भरपूर प्या

दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी आवर्जून प्यावं. यानं यूरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर पडण्यास मदत मिळते आणि किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो.

रोज सकाळी लिंबू पाणी प्या

लिंबानं शरीर अल्कलाइन होतं आणि यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून सकाळी प्यावा.

चेरी खा

चेरीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे सूज कमी करतात. रोज चेरी खाल्ल्यानं यूरिक अ‍ॅसिडचं वाढलेलं प्रमाणही कमी होऊ शकतं.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरनं शरीराची पीएच लेव्हल संतुलित राहते. १ चमचा व्हिनेगर पाण्यात टाकून प्यायल्यास किडनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करतात.

Web Title: Uric acid may cause of kidney stones know how to get rid of uric acid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.