Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > टॉयलेट सीटपेक्षा हजारपट जास्त घाणेरडी असते उशी, पाहा किती दिवसांनी धुवायला हवे पिलो कव्हर

टॉयलेट सीटपेक्षा हजारपट जास्त घाणेरडी असते उशी, पाहा किती दिवसांनी धुवायला हवे पिलो कव्हर

Health Tips : फोन टॉयलेटमध्ये नेल्यास बॅक्टेरिया फोनवर चिकटू शकतात. जेवण करताना किंवा इतर काही काम करताना हे शरीरात जाऊन तुम्ही आजारी पडू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:25 IST2025-01-22T12:24:05+5:302025-01-22T12:25:29+5:30

Health Tips : फोन टॉयलेटमध्ये नेल्यास बॅक्टेरिया फोनवर चिकटू शकतात. जेवण करताना किंवा इतर काही काम करताना हे शरीरात जाऊन तुम्ही आजारी पडू शकता.

Unwashed pillow cover can have 17 thousand more bacteria than a toilet seat | टॉयलेट सीटपेक्षा हजारपट जास्त घाणेरडी असते उशी, पाहा किती दिवसांनी धुवायला हवे पिलो कव्हर

टॉयलेट सीटपेक्षा हजारपट जास्त घाणेरडी असते उशी, पाहा किती दिवसांनी धुवायला हवे पिलो कव्हर

Health Tips : बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस असतात. टॉयलेट सीटवर सगळ्यात जास्त कीटाणू आढळतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये मोबाइल फोन न नेण्याचा सल्ला दिला जातो. फोन टॉयलेटमध्ये नेल्यास बॅक्टेरिया फोनवर चिकटू शकतात. जेवण करताना किंवा इतर काही काम करताना हे शरीरात जाऊन तुम्ही आजारी पडू शकता.

तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण एका रिपोर्टनुसार, तुमच्या उशीच्या कव्हरवर टॉयलेट सीटपेक्षा १७ हजार पटीनं जास्त कीटाणू असू शकता. ही आकडेवारी Amerisleep नं जारी केली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, तुमचा बेड अनेक आजार पसरवणाऱ्या मायक्रोब्सचं घर बनू शकतं.

घातक बॅक्टेरियाचा धोका

उशीच्या कव्हरवर अनेक खतरनाक आणि कमी खतरनाक बॅक्टेरिया असू शकतात. ज्यात ग्राम निगेटीव्ह रोड्स, ग्राम पॉझिटिव्ह रोड्स, बैसिलस आणि ग्राम पॉझिटिव्ह कोकी प्रमुख असू शकतात.

एक चूक पडेल महागात

बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका उशीचं कव्हर योग्य वेळी न धुतल्यामुळे वाढतो. १ आठवड्याआधी धुतलेल्या उशीच्या कव्हरवर टॉयलेट सीटपेक्षा १७, ४४२ पटीनं जास्त बॅक्टेरिया असू शकतात. वेळ वाढण्यासोबत हा धोका अधिक वाढतो.

दर आठवड्यात वाढतात बॅक्टेरिया

जर उशीचं कव्हर २ आठवड्यांआधी धुतलेलं असेल तर यावर टाकीच्या हॅंडलपेक्षा ३३२ पटीनं जास्त बॅक्टेरिया असू शकतात. ३ आठवड्यात सिंकपेक्षा ४०५ पटीनं जास्त आणि चार आठवड्यात पाळीव प्राण्याच्या जेवणाच्या भांड्यापेक्षा ३९ पटीनं जास्त कीटाणू असू शकतात.

हे खतरनाक बॅक्टेरिया पूर्ण बेडवर असू शकतात. हे तुमची चादर, ब्लॅंकेट, गादीवरही असू शकतात. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, उशी तुम्ही ७ वर्षात बदलून टाकावी.

दर आठवड्यात धुवा

या घातक बॅक्टेरियाचा धोका कमी करण्यासाठी उशीच्या कव्हर आठवड्यातून कमीत कमी एक वेळा धुवाव्या आणि चादरही धुवावी. झोपण्याआधी हात-पाय धुवूनही यांचा धोका कमी केला जाऊ शकतो.
 

Web Title: Unwashed pillow cover can have 17 thousand more bacteria than a toilet seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.