Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लिव्हर डॅमेजचं कारण ठरतात 'हे' ३ पदार्थ, खाणं सोडाल तर तुमच्यासोबत लिव्हरचंही वाढेल आयुष्य

लिव्हर डॅमेजचं कारण ठरतात 'हे' ३ पदार्थ, खाणं सोडाल तर तुमच्यासोबत लिव्हरचंही वाढेल आयुष्य

Bad Foods For Liver : सामान्यपणे आपल्याच काही चुकांमुळे लिव्हरचं आरोग्य बिघडतं. अशात शरीरात विषारी तत्व जमा होऊ लागतात. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं खूप गरजेचं ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:14 IST2025-06-26T13:13:47+5:302025-06-26T13:14:17+5:30

Bad Foods For Liver : सामान्यपणे आपल्याच काही चुकांमुळे लिव्हरचं आरोग्य बिघडतं. अशात शरीरात विषारी तत्व जमा होऊ लागतात. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं खूप गरजेचं ठरतं.

Unhealthy foods for liver what are foods that harm liver | लिव्हर डॅमेजचं कारण ठरतात 'हे' ३ पदार्थ, खाणं सोडाल तर तुमच्यासोबत लिव्हरचंही वाढेल आयुष्य

लिव्हर डॅमेजचं कारण ठरतात 'हे' ३ पदार्थ, खाणं सोडाल तर तुमच्यासोबत लिव्हरचंही वाढेल आयुष्य

Bad Foods For Liver :  आजकाल लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या समस्या लोकांना खूप जास्त होत आहेत. खासकरून महिला जास्त नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरनं पीडित असल्याचं अनेकदा आढळून आलं आहे. लिव्हर हे शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतं. लिव्हर शरीरातील वेगवेगळी महत्वाची काम करतं. अशात जर त्यात काही बिघाड झाला तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. सामान्यपणे आपल्याच काही चुकांमुळे लिव्हरचं आरोग्य बिघडतं. अशात शरीरात विषारी तत्व जमा होऊ लागतात. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं खूप गरजेचं ठरतं.

लिव्हरमध्ये गडबड कोणत्या पदार्थांमुळे होते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून हे पदार्थ तुम्ही खाणं-पिणं टाळाल आणि तुम्ही निरोगी राहू शकाल. या पदार्थांमुळेच फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि लिव्हर फेलिअरसारख्या स्थिती समोर येतात. 

काय खाणं-पिणं टाळावे?

प्रोसेस्ड फूड्स 

प्रोसेस्ड फूड्समध्ये भरपूर अनहेल्दी गोष्टी जसे की, फॅट्स, शुगर आणि इतरही गोष्टी टाकल्या जातात. ज्यामुळे लिव्हरवर दबाव वाढतो आणि त्यावर सूज येऊ लागते. जे हे पदार्थ खाणं बंदच केलं नाही तर पुढे जाऊन लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो. ज्यानंतर व्यक्तीच्या जीवालाही धोका होतो.

गोड पेय 

नेहमीच गोड पेय पित असाल तर यानं लिव्हर डॅमेज होण्याचा धोका असतो. याचं कारण या गोड पेयांमध्ये सोडासारखे फ्रुक्टोज आहेत. त्याशिवाय काही फळांच्या ज्यूसनं सुद्धा फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. त्यामुळे पॅकेटमधील किंवा बॉटलमधील गोड पेय टाळायला हवेत.

अल्कोहोल

लिव्हर सगळ्यात जास्त जर कशानं डॅमेज होतं तर ती म्हणजे दारू. तुम्ही नेहमीच दारू पित असाल तर फॅटी लिव्हर आणि नंतर सिरोसिसचा धोका खूप जास्त वाढतो. तसेच शरीरात इतरही समस्या होतात. लिव्हरवर सूज आल्यावर नंतर हेपेटायटिस आणि सिरोसिससारखी स्थिती निर्माण होते. जी लिव्हर खराब होण्याची गंभीर स्थिती आहे.

लिव्हर निरोगी कसं ठेवाल?

लिव्हर फिट ठेवण्यासाठी पालक, मेथी अशा भाज्या आणि केळी खावीत. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटामिन ए, सी आणि के भरपूर असतात. जे लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करतात. तसेच लसणानं सुद्धा लिव्हर साफ होण्यास मदत मिळते. यातील सल्फर तत्वानं लिव्हर डिटॉक्स होतं. तसेच हळद सुद्धा लिव्हरसाठी खूप फायदेशीर मानली जाते. यातील करक्यूमिननं लिव्हरवरील सूज कमी होते आणि ऑक्सीडेटिव तणावही कमी होतो. त्यासोबतच सफरचंद, लिंबू, संत्री, द्राक्ष, पेरू आणि पपई ही फळं लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.

Web Title: Unhealthy foods for liver what are foods that harm liver