Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर पिवळा थर दिसतो, पांढऱ्याशुभ्र दातांसाठी अभिनेत्री निया शर्मा सांगतेय १ देशी उपाय

दातांवर पिवळा थर दिसतो, पांढऱ्याशुभ्र दातांसाठी अभिनेत्री निया शर्मा सांगतेय १ देशी उपाय

TV Actress Nia Sharma Share effective Home Remedy : नियानं अलिकडेच एका सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले दात चमकवण्याचा एक सोपा उपाय शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:18 IST2025-08-30T09:40:33+5:302025-08-30T14:18:15+5:30

TV Actress Nia Sharma Share effective Home Remedy : नियानं अलिकडेच एका सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले दात चमकवण्याचा एक सोपा उपाय शेअर केला आहे.

TV Actress Nia Sharma Share effective Home Remedy For Teeth Whitening And Remove Plaque | दातांवर पिवळा थर दिसतो, पांढऱ्याशुभ्र दातांसाठी अभिनेत्री निया शर्मा सांगतेय १ देशी उपाय

दातांवर पिवळा थर दिसतो, पांढऱ्याशुभ्र दातांसाठी अभिनेत्री निया शर्मा सांगतेय १ देशी उपाय

अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) टिव्हीची स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री आहे. आपली सुंदरता आणि स्माईलसाठी ओळखली जाते. नियाचे हास्य तिच्या मोत्यांसारख्या चमकणाऱ्या दातांमुळे अधिकच खुलून येते. दात सुंदर असतील तर स्माईलही छान दिसते. नियानं अलिकडेच एका सोशल मीडिया अकाऊंटवरून आपले दात चमकवण्याचा एक सोपा उपाय शेअर केला आहे. (TV Actress Nia Sharma Share effective Home Remedy For Teeth Whitening And Remove Plaque)

नियासारखे परफेक्ट चमकदार दात हवे असतील तर तुम्ही हे उपाय करू शकता. नियासारखे काही घरगुती उपाय करून तुम्ही दात पांढरेशुभ्र चमकवू शकता. निया छोट्या छोट्या दातांच्या प्रोब्लेम्ससाठी घरगुती उपाय ट्राय करते. तिला केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा ऑर्गेनिक उत्पादनं फार आवडतात.


दातांमध्ये पिवळेपणा येणं ही गंभीर समस्या आहे ज्यामुळे बरेच लोक त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या चुकांमुळे, चहा-कॉफीचे अतिसेवन, स्मोकींग, खाल्ल्यानंतर गुळण्या न करणं यामुळे दात पिवळे होत जातात. यासाठी तुम्हाला बेकींग सोडा, लिंबू, नारळाचं तेल, मीठ या रोजच्या वापरात असलेल्या वस्तू लागतील.

हा उपाय कसा करायचा?

एका वाटीत बेकिंग सोडा घालून त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. त्यानंतर यात नारळाचं तेल आणि थोडं मीठ घाला. त्यानंतर रोजच्या वापरात असलेली टुथपेस्ट घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता ही पेस्ट वापरण्यासाठी तयार आहे.

नियानं सांगितलं की ही पेस्ट तुम्ही आपल्या एका हातानं दातांवर किंवा हिरड्यांवर व्यवस्थित लावू शकता. त्यानंतर ब्रशनं कमीत कमी २ मिनिटं दातांची सफाई करा. या पद्धतीनं गुळण्या केल्यास दातांचे आरोग्य चांगले राहील. हा उपाय केल्यास दातांवर जमा झालेलं प्लाक कमी होण्यास मदत होईल.

जे दातांचा पिवळेपणा आणि कॅव्हिटीजचं कारण ठरतं. हा उपाय नियानं इंस्टाग्रामवरच पाहिला होता. दातांचा पिवळेपणा कोणासाठीही काळजीचा विषय ठरू शकतो. दातांमधील प्लाक व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास त्याचं रुपांतर टार्टरमध्ये होते. ज्यामुळे पायरीया आणि कॅव्हिटीज यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज 2 वेळा ब्रश करा. काहीही खाल्ल्यानंतर गुळण्या करा. चहा, कॉफी जास्तवेळा घेऊ नका.

Web Title: TV Actress Nia Sharma Share effective Home Remedy For Teeth Whitening And Remove Plaque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.