भारतीय घरांमध्ये हळदीचा वापर बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हळद फक्त अन्नाला रंग देत नाही तर जेवणाची चवही वाढवते. हळदीचे सेवन आरोग्यासाठी बरेच फायदेशीर ठरते. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट्स पाण्यात हळद मिसळून ते पाणी पिण्याचा किंवा दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाबरोबरच हळदीचे पाणी प्यायल्यानं ही तब्येतीला बरेच फायदे मिळतात. प्रसिद्ध अमेरीकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरून याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी हळदीचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगितले आहेत. (Turmeric water or turmeric milk which gives more benefits)
हळदीचे पाणी पिण्याचे फायदे
डॉक्टर सांगतात की हळदीत करक्युमिनअसते. जे एक पॉवरफुल एंटी इंफ्लेमेटरी कंम्पाऊंड आहे. करक्युमिन सांध्यांतील वेदना सूज कमी करते. अनेकचा याचा परीणाम इबुप्रोफेन आणि एस्पिरिन यांसारख्या औषधांप्रमाणे असतो पण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.
अनेक संशोधनांतून समोर आले आहे की हळद ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. खासकरून टाईप २ डायबिटीस असल्यास रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. हे शरीरात मेटाफॉर्मिन सांरख्या औषधांप्रमाणे काम करते. कोणत्याही नुकसानांशिवाय खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
डॉक्टर सांगतात की करक्युमिन सेरोटोनिन आणि डोपामाईन यांसारखे हॅप्पी हॉर्मोन्स वाढवतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो चांगली झोप येते. म्हणून हळदीचं पाणी मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.
हळदीचं पाणी प्यायल्यानं पचनक्रिया मजबूत होते. गॅस, एसिडिटी यांसारख्या समस्या कमी होता. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात याशिवाय इम्यून सिस्टीम मजबूत होते.
एक ग्लास हलक्या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि चुटकीभर काळी मिरी मिसळा. तुम्ही चवीसाठी थोडा लिंबू किंवा मध घालू शकता. हळूहळू याचे सेवन करा. काळी मिरी हळदीतील पोषक तत्व योग्य पद्धतीनं शोषण्यास मदत करते.
हळदीचं पाणी कधी प्यावं?
जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर जेवणाच्या आधी प्या. झोप, इम्यूनिटीशी संबंधित समस्या असतील तर रात्री झोपण्याच्या आधी हे पाणी प्या.
हळदीचं पाणी शरीराला आतून डिटॉक्स करते, सूज कमी करते, मन शांत ठेवते, इम्यूनिटी वाढवते. पण कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
