Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात मोठ्यांसह मुलांनीही खायला हवं गूळ-तूप, एवढ्या साध्या पदार्थांचे फायदे मात्र लाखमोलाचे

हिवाळ्यात मोठ्यांसह मुलांनीही खायला हवं गूळ-तूप, एवढ्या साध्या पदार्थांचे फायदे मात्र लाखमोलाचे

Jaggery and Ghee Benefits in Winter : गूळ आणि तूप एकत्र खाल्लं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:56 IST2025-11-15T11:05:08+5:302025-11-15T14:56:50+5:30

Jaggery and Ghee Benefits in Winter : गूळ आणि तूप एकत्र खाल्लं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

Try eating jaggery and ghee together, you may not even know that it has so many benefits in cold weather | हिवाळ्यात मोठ्यांसह मुलांनीही खायला हवं गूळ-तूप, एवढ्या साध्या पदार्थांचे फायदे मात्र लाखमोलाचे

हिवाळ्यात मोठ्यांसह मुलांनीही खायला हवं गूळ-तूप, एवढ्या साध्या पदार्थांचे फायदे मात्र लाखमोलाचे

Jaggery and Ghee Benefits in Winter : भारतीय किचनमध्ये गूळ आणि तुपाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. गूळ आणि तुपामुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदातही गूळ आणि तुपाच्या मिश्रणाला प्रभावी औषधी मानलं आहे. गूळ आणि तूप एकत्र खाल्लं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अशात जाणून घेऊ थंडीत या दोन गोष्टींचे कसे आणि किती फायदे मिळतात.

गूळ आणि तुपाच्या मिश्रणाने पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते. कारण गुळात फायबर आणि तुपात लॅक्सेटिव गुण असतात. जे बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. जेवणानंतर तूप आणि गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.

गूळ आणि तुपात व्हिटामिन ई, झिंक आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे इम्यूनिटी मजबूत होते. नियमितपणे गूळ आणि तूप खाल्लं तर सर्दी व हिवाळ्यात होणाऱ्या समस्याही दूर करता येतात.

गूळ आणि तुपाच्या कॉम्बिनेशनने शरीर डिटॉक्स करण्यासही मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच त्वचेचं सौंदर्य खुलवण्यास आणि पिंपल्स कमी करण्यासही याने मदत मिळते.

जर तुम्ही नेहमीच तणावात राहत असाल किंवा मूड स्विंगची समस्या होत असेल तर गूळ आणि तुपाचं सेवन करा. यातील अ‍ॅंटी-डिप्रेसेंट गुण मूड चांगला करतात आणि मानसिक तणाव कमी करण्यासही मदत करतात.

गूळ आणि तुपात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडं आणि जॉईंट्स मजबूत होतात. संधिवात आणि जॉईंट्सच्या वेदनेपासून आरामही मिळतो.

Web Title : गुड़ और घी: सर्दियों में सेहत के लिए अनपेक्षित फायदे

Web Summary : गुड़ और घी का मिश्रण पाचन, रोग प्रतिरोधक क्षमता और विषहरण को बढ़ावा देता है। यह कब्ज कम करता है, तनाव घटाता है, मूड बेहतर करता है, हड्डियों को मजबूत करता है और जोड़ों के दर्द से राहत देता है। सर्दियों के आहार में एक सरल, स्वस्थ जोड़।

Web Title : Jaggery and Ghee: Unexpected Winter Health Boost You Need to Know

Web Summary : Jaggery and ghee, a potent Ayurvedic mix, boost digestion, immunity, and detoxification. They alleviate constipation, reduce stress, improve mood, strengthen bones, and offer relief from joint pain. A simple, healthy addition to your winter diet.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.