Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी

वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी

टूथपेस्टमुळे कॅन्सरचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:16 IST2025-05-17T16:12:49+5:302025-05-17T16:16:17+5:30

टूथपेस्टमुळे कॅन्सरचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

toothpaste chemical triclosan can be increase risk of cancer | वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी

वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी

सकाळी उठल्यानंतर लोक दात स्वच्छ करण्यासाठी ब्रशने घासतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या टूथपेस्ट उपलब्ध आहेत. टूथपेस्ट वापरल्याने फक्त दात स्वच्छ होतात असं नाही तर तोंडाची दुर्गंधीही दूर होते. पण टूथपेस्टबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टूथपेस्टमुळे कॅन्सरचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 

टूथपेस्टमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिन या अमेरिकन मॅगजिनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोसन नावाचा घटक आढळतो, जो अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल म्हणून काम करतो. मेडिकल रिसर्चनुसार, टूथपेस्टमध्ये असलेलं ट्रायक्लोसन कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतं.

आतड्याचा कॅन्सर

रिसर्चनुसार, टूथपेस्टमध्ये ट्रायक्लोसन असल्यामुळे आतड्यातील बॅक्टेरियाच्या रचनेत बदल होतो, ज्यामुळे सूज येऊ शकते आणि जळजळ होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत जळजळ आणि सूज कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकते. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन रिसर्चदरम्यान ट्रायक्लोसनची उंदरांवर चाचणी करण्यात आली. काही काळानंतर ट्रायक्लोसनमुळे आतड्यात जळजळ सुरू झाली. हळूहळू आतड्यासंबंधी समस्या वाढल्य़ा आणि उंदरांमध्ये आतड्याचा कॅन्सर दिसून आला.

कशी घ्यायची काळजी?

- कॅन्सरपासून वाचण्यासाठी तुम्ही ट्रायक्लोसनमुक्त टूथपेस्ट वापरू शकता. 

- कोणतीही टूथपेस्ट वापरण्यापूर्वी डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या. 

- विश्वासार्ह ब्रँडची टूथपेस्ट खरेदी करा. 

- कॅन्सर टाळण्यासाठी निरोगी आहार घ्या. 

- बाहेरचे तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड शक्य तितके कमी खा.

- आरोग्यविषयक काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Web Title: toothpaste chemical triclosan can be increase risk of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.