Tomato ketchup Side Effect : सकाळचा नाश्ता असो वा जेवण करायचं असो आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच टोमॅटो केचप जास्त खातात. लहान मुलांना तर सगळ्याच गोष्टींसोबत टोमॅटो केचप हवं असतं. याची गोड आणि चटकदार टेस्ट मुलांना इतकी आवडती की ते प्रत्येक जेवणासोबत तेच मागतात. पालकांनाही वाटतं की यात टोमॅटो आहे, म्हणून आरोग्यासाठी हे चांगलं असेल.
पण खरी गोष्ट अशी आहे की बाजारात मिळणाऱ्या केचपमध्ये खरे टोमॅटो नसतात, तर त्याऐवजी टोमॅटो प्युरी, रिफाइंड साखर, व्हिनेगर, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज यांचं मिश्रण असतं, जे आरोग्यासाठी खासकरून मुलांसाठी, खूप नुकसानकारक आहे. कारण मुलांच्या शरीराची वाढ होत असते आणि अशा पदार्थांमुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास बिघडू शकतो. चला पाहूया, केचप मुलांच्या आरोग्यावर कसा वाईट परिणाम करतो.
जास्त साखर आणि लठ्ठपणा
केचपमध्ये रिफाइंड साखर आणि हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि भविष्यात डायबिटीज व हार्मोनल असंतुलनाचा धोका निर्माण होतो.
भूक आणि पोषणावर परिणाम
केचपचा नियमित वापर मुलांच्या पचन तंत्राला प्रभावित करतो. त्यामुळे त्यांना पौष्टिक अन्न बोरिंग वाटू लागतं. हळूहळू ते संतुलित आहारापासून दूर जातात आणि शरीरात जीवनसत्त्वे व खनिजे यांची कमतरता निर्माण होते.
पचनसंस्थेवर परिणाम
मुलांची पचनसंस्था अतिशय संवेदनशील असते. केचपमध्ये असलेले आम्लीय घटक, व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज यांमुळे गॅस, अपचन, पोटदुखी आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम
केचपमधील कृत्रिम रंग, टेस्ट आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, हायपरॲक्टिव्हिटी आणि वर्तनातील बदल अशा समस्या दिसून येतात.
आजारांचा धोका
लहानपणापासून केचप जास्त खाल्ल्यानं ते शरीरात हळूहळू विषासारखं काम करतं. त्यामुळे पुढे जाऊन हाय ब्लड प्रेशर, फॅटी लिव्हर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
फक्त टेस्टसाठी किंवा त्यांनी जेवण करावं म्हणून मुलांना केचप देणं म्हणजे त्यांच्या आरोग्यासोबत तडजोड करणं आहे. त्याऐवजी घरच्या घरी बनवलेली ताजी टोमॅटो चटणी, दही डिप किंवा पुदिन्याची चटणी हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. त्यामुळे मुलांना टेस्टही मिळेल आणि आरोग्यही टिकेल.
