हल्लीचं रोजचं जगणं इतकं अवघड झालंय की, लोकांना आरोग्याची खूप जास्त काळजी वाटायला लागली आहे. अनेक गोष्टींची आधी वाटत नव्हती तशी भीती जाणवू लागली आहे. म्हणजे बाहेरचं बरेच लोक खातात, पण बरेच लोक असेही आहेत ज्यांना घरचं सोडून बाहेरचं काही खायचं म्हटलं तर धडकी भरते. काही लोकांचा पर्याय नसल्याने बाहेरचं खावं लागतं तो मुद्दा वेगळा. पण लक्षात घेण्यासारखा मु्द्दा हा आहे की, बरेच लोक हल्ली आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घेऊ लागले आहेत आणि बरेच लोक वेळातला वेळ काढून थोडा तरी व्यायाम करत आहेत. या दोन्ही गोष्टी निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, यात दुमत नाही. पण आपण कितीही काळजी घेतली तरी आपल्या रोजच्या बाथरूमच्या सवयी देखील आपल्याला गंभीर आजारी करू शकतात. जास्तीत जास्त लोक बाथरूम रोज अशा काही चुका करतात ज्यांचा परिणाम त्यांना भविष्यात भोगावा लागतो. त्या कोणत्या सवयी ते पाहुयात. डॉ. सौरभ सेठी यांनी अशा तीन सवयींबाबत सांगितलंय ज्या आपण बाथरूम टाळल्या पाहिजे.
प्रेशर रोखणे
टॉयलेट बाथरूमसंबंधी वेगवेगळ्या समस्या अनेकांना रोज होतात. काही लोक काय करतात की, कामात बिझी असल्याने किंवा मुद्दाम आलेलं टॉयलेटचं प्रेशर रोखूण ठेवतात. पण डॉक्टरांचं मत आहे की, ही सवय आपल्या पचन तंत्रासाठी फार घातक आहे. जेव्हा संडासला जायची इच्छा झाली आणि मुद्दाम रोखूण ठेवता तेव्हा शरीर विष्ठेतून पाणी शोषून घेणं कायम ठेवतं. वेस्ट कठोर होतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या होते. जर जास्त वेळ असंच करत रहाल तर आतड्यांची क्षमता स्लो होते. अशात शरीरातील विषारी तत्व बाहेर न काढल्याने शरीरात इतरही अनेक समस्या होऊ लागतात.
सीटवर जास्तवेळ बसून राहणे
हल्ली फोनची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, बाथरूम-टॉयलेटमध्येही फोन सुरूच असतो. ज्यावरून घरात बायकोसोबत अनेकदा वादही होतात. इतकंच नाही तर काही बायका यावरून नवऱ्यांवर संशय सुद्धा घेतात. हा वेगळा विषय आहे. पण टॉयलेट सीटवर बसून बराच वेळ फोन पाहणं फार धोक्याचं आहे. एक्सपर्टचा सल्ला आहे की, फोनशिवाय बाथरूममध्ये ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये. मुळात टॉयलेटची बनावट अशी असते की, त्यावर बसल्याने गुदद्वारावर दबाव पडतो. जेव्हा फोनच्या नादात जास्त वेळ बसता तेव्हा रक्तप्रवाह खंडित होतो. नसांमध्ये सूज येते. त्यामुळे बाथरूमला बाथरूमच ठेवा, ते लायबॅरी किंवा ऑफिस बनवू नका.
जास्त जोर लावणे सकाळी टॉयलेटमध्ये पोट साफ करण्यासाठी भरपूर लोक जास्त रोज लावतात, कुथंतात. पण असं करणं फार जास्त घातक आहे. जास्त दबाव टाकल्याने गुदद्वारातील नसांवर जास्त दबाव पडतो. त्यामुळे पाइल्स होण्याचा धोका अधिक असतो. नेहमीच पोट साफ होण्यासाठी जास्त जोर लावल्याने मलायशयाचा आतील भाग बाहेर सरकतो. ज्याला रेक्टर प्रोलेप्स म्हटलं जातं. त्याशिवाय या जागेवरील त्वचेवर इजा झाल्याने पोट साफ करण्यास अधिक समस्या होते.
Web Summary : Holding urges, prolonged sitting, and excessive straining during bowel movements can harm your digestive system and lead to conditions like constipation and piles. Doctors advise against these common bathroom mistakes for improved health.
Web Summary : शौच रोकने, ज़्यादा देर तक बैठने और ज़्यादा ज़ोर लगाने से पाचन तंत्र को नुकसान पहुँच सकता है और कब्ज़ और बवासीर जैसी समस्याएँ हो सकती हैं। डॉक्टर बेहतर स्वास्थ्य के लिए इन आम बाथरूम की ग़लतियों से बचने की सलाह देते हैं।