आजकालच्या अनहेल्दी लाईफस्टाईल आणि चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित समस्या खूपच कॉमन झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, पोट साफ असणे अत्यंत आवश्यक असते. निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच दररोज आणि योग्य वेळेला मलत्याग करणे देखील आवश्यक असते. पचनसंस्था व्यवस्थित राहण्यासाठी (Toilet mistakes affecting gut health) दररोज ठराविक वेळी शौचाला जाण्याची सवय लावणे गरजेचे असते. आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठता, पोटफुगी, गॅस आणि इतर पचनासंबंधी तक्रारी वाढतात. यासाठीच, निरोगी आरोग्यासाठी मलत्यागाच्या योग्य सवयी आणि वेळ पाळणे हे आरोग्य चांगले राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते(Morning toilet routine for gut health).
मलत्याग ही एक अशी प्रक्रिया आहे, जी नियमितपणे आणि योग्यरित्या झाली तर पचनक्रियेपासून ते संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. सकाळी उठल्यानंतर जर पोट पूर्णपणे व्यवस्थित साफ झाले नाही, तर दिवसभर कामावर परिणाम होतो आणि अनहेल्दी वाटते. ना कामात मन लागते, ना काही खाण्याची इच्छा होते आणि पोटही जड, फुगलेले वाटते. खरंतर, अनेकदा आपण मलत्याग (How long should bowel movement take) करताना अशा काही चुका करतो, ज्यामुळे दीर्घकाळात आतड्यांच्या आणि पोटाच्या गंभीर समस्या निर्माण होतात. काहीजण मलत्यागाच्या वेळी तासंतास टॉयलेटमध्ये बसून राहतात, तर काहीजण दिवसातून अनेक वेळा टॉयलेटला जातात. निरोगी पचन आणि संपूर्ण आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी मलत्यागाची योग्य वेळ, दिवसातून किती वेळा टॉयलेटला जावे आणि या दरम्यान कोणत्या गंभीर चुका टाळाव्यात, याबद्दलची माहिती तज्ज्ञ डॉक्टारांकडून घेऊयात...
मलत्यागासाठी नेमका किती वेळ लागणे आहे नॉर्मल?
एक्सपर्ट्सच्या मते, मलत्याग करणे हा आपल्या पचनसंस्थेशी संबंधित एक महत्त्वाचा भाग आहे. मलत्याग करण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ नाही. पण, एका निरोगी व्यक्तीसाठी याची मर्यादा दिवसातून तीन वेळा (जास्तीत जास्त) ते आठवड्यातून तीन वेळा (कमीत कमी) इतकी आहे. जर या मर्यादेपेक्षा कमी किंवा जास्त वेळा मलत्याग होत असेल, तर तो बद्धकोष्ठता किंवा अतिसार होण्याचा संकेत असू शकतो. मलत्याग करण्याच्या प्रक्रियेस साधारणपणे दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये. ही प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा जोर न लावता आणि सहजपणे व्हायला हवी. जर मलत्याग करताना काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असेल किंवा वेदना होत असेल, तर ते बद्धकोष्ठतेचे लक्षण असू शकते.
हिवाळ्यात घशाची खवखव- सर्दी - खोकल्यावर नागवेलीच्या पानांचा रामबाण उपाय - एकदाच करा मिळेल आराम...
मलत्यागासाठी 'उत्तम' वेळ कोणती ?
मलत्याग करण्यासाठी कोणतीही निश्चित वेळ नाही. परंतु, तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजा समजून घेणे आणि मलत्याग करण्यासाठी पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे सकाळची वेळ मलत्याग करण्यासाठी सर्वात चांगली मानली जाते. कारण या वेळी पोट रिकामे असते आणि मलत्याग करण्याची प्रक्रिया सहजसोपी होते. मलत्याग करण्यापूर्वी पाणी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे आतड्यांची हालचाल उत्तम पद्धतीने होण्यास मदत होते.
मलत्यागासाठी जास्त वेळ बसल्यास नेमकं काय होत ?
हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि एम्स येथून प्रशिक्षित असलेले गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, मलत्याग करण्यासाठी जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहणे आणि जोर लावणे हे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळे हेमोरॉयड्स म्हणजेच मूळव्याध आणि एनल फिशर यांसारख्या समस्या होऊ शकतात. जर मल १० मिनिटांत सहजपणे बाहेर येत नसेल, तर वारंवार जोर लावण्याऐवजी थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. असे केल्याने, आतड्यांचे आरोग्य चांगले रहाते आणि पचनसंस्थेवर अनावश्यक ताण पडत नाही.
फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...
योग्य स्थितीत बसा...
मलत्याग करताना योग्य स्थितीत बसण्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. टॉयलेट करण्यासाठी बसताना स्क्वॉटिंग पोजीशन म्हणजेच पाय थोडे वर उचलून बसणे, यामुळे आतड्या रिलॅक्स होतात आणि मलत्याग करणे सोपे होते.
