Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस वाढेल म्हणून दिवाळीत गोड खाणारच नाही ? ५ टिप्स, गोड खाऊनही शुगर वाढणार नाही...

डायबिटीस वाढेल म्हणून दिवाळीत गोड खाणारच नाही ? ५ टिप्स, गोड खाऊनही शुगर वाढणार नाही...

Tips to control blood sugar and celebrate the festival guilt free : how to control blood sugar during festivals : दिवाळीच्या फराळाची गोड चव चाखत असतानाच, डायबिटीसही राहील नियंत्रणात फक्त करा ५ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 14:45 IST2025-10-13T14:09:42+5:302025-10-13T14:45:36+5:30

Tips to control blood sugar and celebrate the festival guilt free : how to control blood sugar during festivals : दिवाळीच्या फराळाची गोड चव चाखत असतानाच, डायबिटीसही राहील नियंत्रणात फक्त करा ५ गोष्टी...

tips to control blood sugar and celebrate the festival guilt free how to control blood sugar during festivals blood sugar management during festive season | डायबिटीस वाढेल म्हणून दिवाळीत गोड खाणारच नाही ? ५ टिप्स, गोड खाऊनही शुगर वाढणार नाही...

डायबिटीस वाढेल म्हणून दिवाळीत गोड खाणारच नाही ? ५ टिप्स, गोड खाऊनही शुगर वाढणार नाही...

दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, आनंदाचा क्षण आणि... खमंग, गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल! लाडू, शंकरपाळी, करंजी, बर्फी...यांसारख्या फराळाच्या पदार्थांना 'नाही' म्हणणं डायबिटीस असणाऱ्यांसाठी खूपच कठीण असतं. सणासुदीच्या या वातावरणात आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याची इच्छा दाबून टाकणं म्हणजे आनंदाला मुरड घालण्यासारखंच आहे. दिवाळीत आपल्याकडून गोडाधोडाचे पदार्थ थोडे जास्त प्रमाणात खाल्ले जातात. परंतु डायबिटीस असलेल्यांसाठी असे गोडाधोडाचे पदार्थ खाताना भरपूर काळजी घ्यावी लागते. या खास सणावाराच्या दिवसांत, लाडू, पेढे, आणि मिठाया टाळणं अवघड असतं, पण त्याचवेळी आरोग्यही (blood sugar management during festive season) बिघडू नये याची खबरदारी घ्यावी लागते. 

पण, काळजी करू नका! यंदाच्या (ways to enjoy sweets without raising blood sugar) दिवाळीत तुम्ही गोडाधोडाचे पदार्थ खाऊनही तुमचं डायबिटीस नियंत्रणात ठेवू शकता. त्यासाठी गरज आहे ती थोड्या जागरूकतेची, योग्य नियोजनाची आणि काही स्मार्ट टिप्स फॉलो करण्याची...काही सोप्या (how to control blood sugar during festivals) आणि स्मार्ट टिप्सच्या मदतीने आपण दिवाळीच्या फराळाची गोड चव चाखत असतानाच डायबिटीसही नियंत्रणात ठेवू शकता. या सणासुदीत गोड खाऊनही ब्लड शुगर लेव्हल कशी सांभाळता येईल याच्या काही खास टिप्स पाहूयात... 

१. मिठाईसाठी आरोग्यदायी पर्याय निवडा :- दिवाळीत गोड मिठाई फार मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. पण बाजारातील मिठाईमध्ये साखर आणि मैद्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. त्याऐवजी, घरीच मिठाई किंवा गोड पदार्थ तयार करु शकता, ज्यात साखरेचा वापर कमी असेल किंवा नैसर्गिक गोडव्यासाठी खजूर, गूळ यांसारखे पदार्थ वापरलेले असतील. खजूर, अंजीर, आणि बदाम यांसारख्या पदार्थांपासून बनवलेले लाडू चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप चांगले असतात. मैद्याऐवजी ओट्स किंवा नाचणीचे पीठ वापरा. यात फायबर भरपूर प्रमाणात असते आणि हे रक्तातील साखर हळूहळू वाढवतात. जर तुम्हाला गोड पदार्थ तयार करायचा असेल, तर साखरे ऐवजी स्टीविया किंवा गुळाचा वापर करा.

बदाम, अक्रोडसोबतच मुलांना खाऊ घाला ड्रायफ्रूट्सचा 'हा' खास प्रकार! डॉक्टर सांगतात, मुलांची होईल सुपरग्रोथ... 

२. खाताना पोर्शन कंट्रोल करा :- गोड मिठाई आणि इतर फराळाच्या पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहणे खूप कठीण आहे. मग, त्याऐवजी ते वेगळ्या पद्धतीने आपण खाऊ शकता. खाण्याच्या प्रमाणावर (Portion) लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. एकाच वेळी खूप जास्त खाण्याऐवजी, दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात खा. जसे की, मिठाईचा एक मोठा तुकडा खाण्याऐवजी, त्याचे छोटे-छोटे तुकडे करुन खा. यामुळे गोडाधोडाचे पदार्थ खाल्ल्याचा आनंद होईल आणि रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहील.

दीपिका - कतरीना भूक लागल्यावर खातात १ पदार्थ! म्हणून आहेत सुपरफिट आणि मेंटेन्ड - पाहा त्यांचे डाएट सिक्रेट...

३. गोड खाण्याआधी फायबरयुक्त पदार्थ खा :- दिवाळीत फराळाचे गोडधोड पदार्थ खाण्यापूर्वी, फायबरयुक्त पदार्थ खा. फळे, सॅलॅड किंवा भाजलेले चणे  यांसारखे स्नॅक्स खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर दोन्ही असतात, जे साखरेला हळूहळू रक्तात मिसळू देतात. यामुळे तुम्हाला अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा देखील कमी होते.

४. एक्सरसाइज करायला विसरू नका :- सणासुदीच्या काळात आपण अनेकदा आपले डेली रुटीन विसरून जातो, पण जर तुम्हाला डायबिटीस असेल, तर हलकी-फुलकी एक्सरसाइज करणे अजिबात सोडू नका. गोडाधोडाचे पदार्थ किंवा जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटे वॉक नक्की करा. यामुळे शरीराला रक्तातील साखर बर्न करण्यास मदत मिळते, किंवा तुम्हाला आवडेल अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी करायला विसरु नका. 

५. पाणी पिऊन हायड्रेटेड राहा :- पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि शुगर लेव्हल देखील नियंत्रित ठेवते. त्यामुळे, दिवाळीच्या या दिवसात भरपूर पाणी प्या. गोड कोल्डड्रिंक्स घेणे टाळा, कारण यांमध्ये साखर आणि कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात. याऐवजी, लिंबू पाणी किंवा टोमॅटोचा ज्यूस यांसारखी साखर नसलेली पेये प्या.

 डायबिटीस  आहे याचा अर्थ तुम्ही सणांचा आनंद घेऊ शकत नाही असे नाही. फक्त थोडे योग्य नियोजन आणि काळजी घेतली तर, तुम्ही देखील आरोग्यदायी आणि आनंदी दिवाळी साजरी करू शकता!

Web Title : ब्लड शुगर बढ़ाए बिना दिवाली की मिठाई का आनंद लें: 5 टिप्स

Web Summary : डायबिटीज के मरीज हेल्दी विकल्प चुनकर, भाग नियंत्रित करके, फाइबर युक्त भोजन खाकर, व्यायाम करके और हाइड्रेटेड रहकर दिवाली की मिठाई का आनंद ले सकते हैं। स्मार्ट विकल्प ब्लड शुगर को प्रबंधित करने में मदद करते हैं।

Web Title : Enjoy Diwali sweets without raising blood sugar: 5 tips

Web Summary : Diabetics can enjoy Diwali sweets by choosing healthy options, controlling portions, eating fiber-rich foods, exercising, and staying hydrated. Smart choices help manage blood sugar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.