आपल्या भारतीय थाळीत वेगवेगळे पदार्थ असतात. चपातीपासून तोंडी लावायच्या चटणीपर्यंत वेगवेगळ्या रंगाचे, चवींचे पदार्थ असतात. जेवणाच्या ताटातील असे सगळेच पदार्थ बघून (Tips For Healthy Eating With Diabetes) आपल्याला ते खाण्याची इच्छा होते. शक्यतो जेवायला बसल्यावर आपण ताटातील आपल्या सगळ्यांत (Diabetes and healthy eating) आवडीचा पदार्थ आधी खातो. याचबरोबर, आपण सहसा जेवणाची सुरुवात चपाती भाजी खाऊनच करतो. परंतु जेवणाची सुरुवात करताना नेमका पहिला घास कोणत्या पदार्थाचा घ्यावा असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतोच(tips for healthy eating for diabetic patients).
आपण जे काही खातो तसेच आपण असतो. आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोच. जेवणाची सुरुवात करताना ताटातील कोणत्या पदार्थाचा घास सगळ्यांत पहिल्यांदा खावा याबद्दल नेमकी माहिती फारशी कुणालाच नसते. यासाठीच, डॉक्टर मानसी यांनी त्यांच्या drmanasi_ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जेवणाची सुरुवात करताना कोणत्या पदार्थाचा घास सगळ्यात आधी खावा याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
जेवताना कोणत्या पदार्थाचा घास आधी खावा ?
डॉक्टर मानसी यांच्या मते, आपल्या शरीरातील ग्लायसेमिक्स इंडेक्सची लेव्हल योग्य पद्धतीने मेंटेन करण्यासाठी, मधुमेही व्यक्तींनी सगळ्यात पहिला घास भाजीचा खावा. ताटातील कोणत्याही प्रकारची भाजी खाऊन जेवणाला सुरुवात करावी.
भाजी खाऊन झाल्यानंतर कोशिंबीर खावी, आणि त्यानंतर चपाती भाजीसोबत खावी. मधुमेहींनी जर अशा क्रमाने जेवणातील पदार्थ खायला सुरुवात केली तर आपल्या शरीरातील ग्लायसेमिक्स इंडेक्सची लेव्हल योग्य प्रमाणात राहते तसेच रक्तातील साखरेचं प्रमाण देखील योग्य पद्धतीने राखण्यास मदत होते.
खरंतर, आयुर्वेदानुसार मधुरसाने जेवणाची सुरुवात करावी. परंतु आपण उलट पद्धतीने जेवण जेवतो, ताटातील गोड पदार्थ आपण जेवण झाल्यावर सगळ्यात शेवटी खातो. आयुर्वेदानुसार, अन्नपदार्थ पचनास मधुरस फार आवश्यक असतो. आपण शक्यतो भाज्यांना चव येण्यासाठी त्यात किंचित साखर किंवा गूळ घालतोच, त्यामुळे मधुमेही व्यक्तींसोबतच इतरांनी देखील जेवणाची सुरुवात भाजी खाऊनच करावी.
फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...
मधुमेह हा एक क्रोनिक आणि लाईफस्टाईलशी निगडीत आजार आहे. यात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते आणि वाढत जाते. अशा स्थितीत मधुमेही व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला हवं. हाच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा उत्तम उपाय असतो. डायबिटीस असल्यास आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. यासोबतच, ते पदार्थ खाण्याचा क्रम देखील योग्य पद्धतीने ठेवल्यास ग्लायसेमिक इंडेक्स योग्य प्रमाणांत राखून डायबिटीस सारखे वर - खाली होण्याचा धोका कमी होण्यास मदत मिळते.