Join us

आयुष मंत्रालयाने सांगितले ३ सोपे नियम! पचनसंस्था राहील ठणठणीत - पोटाचे विकार होतील कायम दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 16:03 IST

How To Keep Digestion Healthy : Ayush Mantralaya Shares Golden Rules For Better Digestion & Good Gut Health : Tips for Better Digestion : खाण्याच्या सवयींमधील छोटे-छोटे बदल पचनक्रिया आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात...

निरोगी राहण्यासाठी पचनसंस्था मजबूत आणि चांगली असणे खूप महत्त्वाचे असते. जर तुमचं पचन योग्य असेल तर तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. पोटाचं आरोग्य बिघडलं की आपोआप अनेक समस्या सुरू होतात. जर आपल्या (Ayush Mantralaya Shares Golden Rules For Better Digestion & Good Gut Health) पचनाची क्रिया आणि पचनसंस्था दोन्ही अगदी योग्य पद्धतीने सुरळीतपणे काम करत असतील तर, आपणही तितकेच हेल्दी आणि फिट रहातो. सध्याची (How To Keep Digestion Healthy) धावपळीची लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती, अयोग्य खाण्याच्या (Tips for Better Digestion) वेळा याचा पचनसंस्थेवर वारंवार ताण येतो. यामुळे अनेकदा पोटदुखी, गॅस, अपचन आणि इतर समस्या उद्भवतात, ज्यांचा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो.

आपल्यापैकी बहुतेकजण पचनक्रिया व पचनसंस्थेकडे दुर्लक्ष करतात आणि दिवसभर काही ना काही अनहेल्दी खाणं खातात. अशावेळी पचनसंस्था ते अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही. पोटात अनहेल्दी अन्नपदार्थ गेल्यामुळे आपण स्वतःच अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत असतो. आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवं, याबद्दल आयुष मंत्रालयाने नुकतेच 'गोल्डन रूल्स' शेअर केले आहेत, जे खाण्याच्या सवयींमध्ये छोटे-छोटे बदल करून पचनक्रिया आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरतात. 

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'गोल्डन रूल्स'... 

१. आयुर्वेदानुसार, योग्य पद्धतीने भोजन करण्याचा अर्थ म्हणजे फक्त ताटात पौष्टीक पदार्थच असणे असा होत नाही, तर ते जेवण्याची योग्य पद्धत देखील तितकीच महत्वाची असते. नेहमी शांतपणे आणि चांगल्या लोकांच्या सोबतीत आनंदाने आपले जेवण पूर्ण करा. जेवण करताना राग, भीती किंवा तणाव टाळा, कारण हे घटक पचनक्रियेवर थेट परिणाम करतात. जेवणाचा आनंद घेत खा. प्रत्येक घास हळूहळू आणि चांगल्या प्रकारे चावून खा, यामुळे चव तर वाढतेच, यासोबतच आपल्या शरीरातील पाचक एंजाइम्स देखील ॲक्टिव्ह होतात.

मासिक पाळीत रक्तस्त्राव खूप कमी होतो? आहारात नियमित हवे ५ पदार्थ- तब्येतही सुधारेल लवकर...

२. पचनक्रिया सुरळीत पद्धतीने काम करण्यासाठी जेवणासोबतच, पाणी पिण्याची योग्य पद्धत देखील तितकीच आवश्यक असते. जेवण करताना घोट-घोट पाणी पिणे पचनासाठी फायदेशीर असते. जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो, त्यामुळे जेवण झाल्यावर ४० ते ४५ मिनिटांनीच जास्त पाणी प्या. यामुळे पचनसंस्थेवर अनावश्यक दबाव येत नाही आणि अन्नपचन व्यवस्थित होते.

सण - उत्सवाला तळण तर होणारच, कोणतं तेल तळण्यासाठी चांगलं? तेलकट खाऊनही बिघडणार नाही तब्येत...

३. आयुर्वेदानुसार, नेहमी ताजे जेवण किंवा अन्नपदार्थ खावेत. तुमचं जेवण ऋतूनुसार आणि तुमच्या शरीराच्या प्रकृतीला अनुकूल असेच असावे. जास्त जड जेवण किंवा अन्नपदार्थ खाणे टाळा. रात्रीचं जेवण हलकं घ्यावं. हे छोटे-छोटे बदल केल्याने केवळ पचनसंस्थाच मजबूत होत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले राहते.

वात-पित्त-कफ प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक प्यावे? कुणासाठी काय चांगलं, कशानं वाटेल फ्रेश...

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स